Sonam Kapoor blessed with Baby Boy: अभिनेत्री सोनम कपूर हिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोनमला पुत्रप्राप्ती झाली आहे. नीतू कपूर यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. सोनमची आई सुनीता कपूर हिनं ही पोस्ट री-शेअर केली आहे. या बातमीनंतर कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सोनम व तिचे पती आनंद आहुजा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोनम कपूर व आनंद आहुजा या दोघांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘२०.०८.२०२२ रोजी आम्ही आमच्या गोंडस बाळाचं मनापासून स्वागत केलं. ही केवळ सुरुवात आहे, पण आम्हाला माहीत आहे की आमचं आयुष्य आता कायमचं बदलून गेलं आहे,’ असं त्यांनी सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोनम व आनंद या दोघांनीही सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
सोनम कपूर व आनंद आहुजा ८ मे २०१८ रोजी पारंपरिक पद्धतीनं पार पडला होता. त्यानंतर सोनम पतीसह लंडनला स्थायिक झाली होती. मार्च २०२२ रोजी त्यांनी आपल्याकडं 'गुड न्यूज' असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सोनम कपूर हिनं बेबी बंपसह फोटोशूटही केलं होतं. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटो शेअर करताना सोनमनं आपल्या भावनाही मांडल्या होत्या. ‘चार हात तुला उराशी कवटाळायला सज्ज आहेत. दोन हृदये तुझ्यासोबत धडकतील. एक कुटुंब आणि भरपूर प्रेम. आम्ही तुझ्या स्वागतासाठी आतुर आहोत,’ असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं होतं.
लवकरच सोनम कपूर 'ब्लाइंड' या चित्रपटात झळकणार आहे. २०११ साली आलेल्या 'ब्लाइंड' या कोरियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. सोनम शिवाय विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या