मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वयाने ११ वर्ष लहान अली गोनीच्या प्रेमात पडलेल्या सोनाली फोगाट, टीव्हीवर केलं होतं प्रपोज

वयाने ११ वर्ष लहान अली गोनीच्या प्रेमात पडलेल्या सोनाली फोगाट, टीव्हीवर केलं होतं प्रपोज

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 23, 2022 06:05 PM IST

sonali phogat pruposed aly goni: सोनाली त्यांच्यापेक्षा वयाने ११ वर्ष लहान असणाऱ्या अलीच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी अलीला त्यांच्या भावना देखील बोलून दाखवल्या होत्या.

सोनाली फोगाट
सोनाली फोगाट

'बिग बॉस १४' फेम सोनाली फोगाट यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सोनाली यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. सोनाली यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोनाली यांना आपलं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायला आवडायचं. सलमान खानच्या हिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस १४' मध्ये त्यांनी वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. आपल्या स्वभावाने त्यांनी घरातल्यांसोबतच प्रेक्षकांची मनं देखील जिंकली होती. याच दरम्यान त्या बिग बॉसच्या घरात असणाऱ्या अली गोनी याच्या प्रेमात पडल्या होत्या.

सोनाली त्यांच्यापेक्षा वयाने ११ वर्ष लहान असणाऱ्या अलीच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी अलीला त्यांच्या भावना देखील बोलून दाखवल्या होत्या. अलीने देखील सोनाली यांच्या भावना समजून घेत त्यांच्यासोबत मैत्रीचं नातं जपलं होतं. बिग बॉस संपल्यानंतरही त्यांनी आपली मैत्री जपली होती. सोनालीने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, 'मी याबद्दल माझ्या मुलीसोबत, आईसोबत आणि वडिलांसोबत बोलले आहे. आणि या गोष्टीमुळे त्यांना मुळीच वाइट वाटलेलं नाही. कुणीतरी आपल्याला आवडणं काही वाइट गोष्ट नाही. मी ज्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि जे काही बोलले त्यामुळे माझ्या घरातल्यांना आणि माझ्या चाहत्यांना मुळीच प्रॉब्लेम नाहीये. ते अजूनही माझ्या सोबत आहेत.'

त्या पुढे म्हणालेल्या, 'माझ्या मुलीने हा कार्यक्रम पाहिलाय तिला अलीबद्दलच्या माझ्या भावनांवर मुळीच आक्षेप नाहीये. मी नॅशनल टीव्हीवर जे काही बोलले त्याचा मला मुळीच पश्चाताप होत नाहीये.' सोनाली यांनी संजय फोगाट यांच्याशी लग्न केलं होतं मात्र त्यांच्या पतीचं २०१६ मध्ये निधन झालं. त्यानंतर सोनाली यांनी एकटीने आपल्या मुलीला वाढवलं. मात्र आता त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

IPL_Entry_Point

विभाग