बॉलिवूडमधील अतिशय गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'दिल चाहता है.' या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसली होती. या चित्रपटातून सोनालीला तुफान लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी सोनालीचा लव्ह स्टार हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, सोनालीला अनेक जुन्या चित्रपटांविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी तिला संजय दत्तसोबत दिलेल्या इंटिमेट सीनवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. चला जाणून घेऊया अभिनेत्री काय म्हणाली.
सोनाली आणि संजय दत्त यांनी मिशन काश्मीर या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी बेडरुममध्ये एक इंटिमेट सीन देखील दिला आहे. हा सीन शूट करण्यापूर्वी सोनालाही नर्वस होती. तिला सीन शूट करण्यास संजय दत्तने कसे मनवले याविषयी तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
सोनालीने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, 'आमचा एक सीन होता त्याला बेडरुम सीन असे बोलले जात होते. खरं तर असे बोलण्याची काही गरज नव्हती. त्यावेळी माझी एक हेअर ड्रेसर होती. ती माझी खासगी नव्हती. मी जसे कपडे बदलायला सुरुवात केली तिने मला थेट विचारले तुम्ही वॅक्सिन घेतले आहे ना. मी तिला विचारले काय?... त्यावर मी तिला पुन्हा हो मी वॅक्सिन घेतले आहे असे म्हणाले. मी खूप चांगला गाऊन घातला होता. पण थोडी नर्वस होते. माझे ओठ कापत होते, माझी हाताची बोटे थरथरत होती आणि सीन असा होता की संजय दत्त मला सांगत असतो आफताबने मला अब्बा म्हटले. त्यावर मी त्याला सांगते ती त्याने मला आधीच अम्मी म्हटले आहे. मच्यात एक छोटासा वाद होतो आणि शेवटी आम्ही मिठी मारतो.'
पुढे सोनालीने सांगितले की, 'संजय दत्तने मला बेडरुममध्ये बोलावले आणि म्हणाला या सीनमध्ये तुला माझी पप्पी पण घ्यायची नाही. या सीनमध्ये काहीच नाही, फक्त दोन डायलॉग आहेत आणि मिठी मारायची आहे. मी पहिलेच नर्वस आहे आणि त्यात तू मला आणखी नरवस करत आहेस. तू थोडं शांत हो. त्यानंतर बेडरुम सीन एकदम उत्तम प्रकारे शूट झाला.' हे सांगत असताना सोनालीला हसू अनावर झाले होते.
वाचा: आपण सर्वजण आई-वडिलांच्या सेक्सचा...; कंडोमच्या जाहिरातींची खिल्ली उडवणाऱ्यांना अन्नू कपूरचं उत्तर
सोनाली कुलकर्णीचा काही दिवसांपूर्वी 'शॉर्ट आणि स्विट' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर आता ती हॅलो नॉक-नॉक कौन है या चित्रपटात झळकणार असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय तिचे आणखी काही मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या