फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट यांचे जवळचे नाते आहे. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न करुन संसार थाटला आहे. यामध्ये बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा देखील समावेश आबे. तिने ३० वर्षांपूर्वी 'आग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आणि सौंदर्याने सोनालीने सर्वांची मने जिंकली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सोनालीचे नाव हे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरशी जोडले जात आहे. आता यावर सोनालीने स्वत: वक्तव्य केले आहे.
सोनाली बेंद्रेने नुकतीच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने शोएब अख्तरसोबतच्या नात्यावर भाष्य केले आहे. तसेच पाकिस्तानमध्ये सोनालीचे किती आहेत हे देखील तिने सांगितले आहे. चला जाणून घेऊया सोनाली नेमकं काय म्हणाली...
वाचा: '३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधले', मतदार यादीतून अभिनेता सुयश टिळकचे नाव गायब
सोनालीला या पॉडकास्टमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने 'मला नाही माहित यामध्ये किती तथ्य आहे. कारण त्यावेळी अनेक अफवा पसरल्या जात होत्या' असे ती म्हणाली. म्हणजे एकंदरीत सोनालीला ही शोएब अख्तरच्या प्रेमाविषयी फारसे किंवा स्पष्ट माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या केवळ अफवा आहेत.
वाचा: ‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या
सोनालीने करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिने १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'आग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यावेळी सोनालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा ती केवळ १९ वर्षांची होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'हम्मा हम्मा' या चित्रपटातून सोनालीला संपूर्ण देशभरात ओळख मिळाली. त्यानंतर सोनालीने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने चित्रपट निर्माता गोल्डी बहलशी लग्न केले. सोनालीला एक मुलगा आहे. त्यानंतर २०१८मध्ये सोनालीला कॅन्सर झाला. तिने यावर जवळपास तीन वर्षे उपचार घेत मात केली.
वाचा: १० फ्लॉप चित्रपटांनंतर राजकुमारचा 'श्रीकांत' ठरतोय हिट, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई
सोनाली सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत आहे. पण तिने पॉडकास्टमध्ये केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जवळपास ३० वर्षांनंतर सोनाली पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमावर मौन सोडले आहे.