मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'अंडरवर्ल्डमुळे मला...', सोनाली बेंद्रेचा धक्कादायक खुलासा
सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रे (HT)
27 June 2022, 9:52 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 9:52 IST
  • बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यामधील कनेक्शनचा सोनाली बेंद्रेने खुलासा केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्री आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंध अनेकदा चर्चेत असतात. ९०च्या दशकात तर अंडरवर्डशी संबंध असलेल्यांचा बॉलिवूड चित्रपटांमध्ये हस्तक्षेप असायचा असे म्हटले जायचे. आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (sonali bendre) यावर उघडपणे वक्तव्य केले आहे. त्यावेळी तिने अंडरवर्ल्डसाठी बॉलिवूड हे एकदम सोपं लक्ष्य आहे असे देखील म्हटले.

ट्रेंडिंग न्यूज

सोनालीने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींवर बिनधास्तपणे वक्तव्य केले. '९०च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हे अंडरवर्डच्या दबावाखाली काम करायचे. त्यावेळी त्यांनी बेकायदेशीरपणे चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले होते. आश्चर्याची बाब म्हणजे जर त्यावेळी या प्रकरणात चित्रपटसृष्टीमधील लोकांनी त्यांना साथ दिली नसती तर त्यांना कधीच काम मिळाले नसते' असे सोनाली म्हणाली.
Video: ‘ब्रा तरी घाल’, ब्रालेस लूकमुळे पूनम पांडे झाली ट्रोल

पुढे सोनाली तिचा अनुभव सांगत म्हणाली, 'अंडरवर्ल्ड डॉन यांच्या दबावामुळे मला अनेक चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एखाद्या चित्रपटाची ऑफर मला मिळते असे वाटताच तो चित्रपट हातून जायचा. माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली जायची. याबाबत काहीच बोलू नको म्हणून सहकलाकार आणि दिग्दर्शकांचा माझ्यावर दबाव असायचा.'

या सर्वात सोनालीला पतीने पाठिंबा दिला होता. “चित्रपट निर्मात्यांच्या प्रत्येक खेळीपासून मला लांब राहायचे होते. यामध्ये मी यशस्वी सुद्धा झाले. कारण माझे पती गोल्डी बहल यांनी माझी खूप मदत केली. कोणत्या चित्रपटाची निर्मिती कोण करत आहे? कोणत्या चित्रपटामागे अंडरवर्ल्ड डॉनचे पैसे नाहीत? याबाबत गोल्डी मला माहिती द्यायचे.”

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग