बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने २३ जून रोजी लग्नगाठ बांधली. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे. सध्या सोनाक्षी आणि जहीर दोघेही हनीमूनला गेले आहेत. त्यांचे तेथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका फोटोमध्ये जहीर सोनाक्षीवर ओरडणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झाल्याची चर्चा सुरु आहे.
जहीरने सोनाक्षीचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी हसताना दिसत आहे. तसेच जहीर देखील हसत असल्याचे दिसत आहे. सोनाक्षीला काही तरी बोलायचे असते पण तिला हसू अनावर झाले आहे. सोनाक्षीला खरं तर जहीरला ओरडायचे असते. पण तिला हसणे कंट्रोल होत नाही. ती केवळ हसतानाच दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जहीरने सोनाक्षी मला ओरडणार असते पण मी तिला हसायला भाग पाडले असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण
सोनाक्षी आणि जहीर हे हनीमुनला कुठे गेले आहेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये दोघे स्विमिंगपूलमध्ये मजामस्ती करताना दिसत आहेत.
सोनाक्षी आणि जहीरने नोंदणीपद्धतीने विवाह केला आहे. सोनाक्षीच्या घरी हा विवाह सोहळा पार पडला. रजिस्टर वेडिंगदरम्यान दोघांनीही ऑफ व्हाईट आउटफिट परिधान केले होते. सोनाक्षीने ऑफव्हाईट कलरची तर झहीरने ऑफव्हाईट कलरचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. यानंतर संध्याकाळी दोघांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शनला सोनाक्षीने लाल रंगाची साडी परिधान केली होती.
वाचा: मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष
नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या शत्रुघ्न यांनी आपल्या मुलीचे लग्न झाल्याचा आनंद व्यक्त केला. आपल्या मुलीला सुखी वैवाहिक जीवन जगताना पाहून त्यांना खूप बरं वाटतं. ते म्हणाले की, मुलगी सुखी आहे, मी आनंदी आहे.
वाचा: प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये
संबंधित बातम्या