मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लग्नाआधीच होणाऱ्या सासू-सासऱ्यांना भेटायला गेली सोनाक्षी सिन्हा! फोटोनी वेधलं साऱ्याचं लक्ष

लग्नाआधीच होणाऱ्या सासू-सासऱ्यांना भेटायला गेली सोनाक्षी सिन्हा! फोटोनी वेधलं साऱ्याचं लक्ष

Jun 17, 2024 08:07 AM IST

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाबाबत स्टार्सच्या सतत प्रतिक्रियाही समोर येत आहेत. त्याचबरोबर आता त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. २१ जून रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

लग्नाआधीच होणाऱ्या सासू-सासऱ्यांना भेटायला गेली सोनाक्षी सिन्हा!
लग्नाआधीच होणाऱ्या सासू-सासऱ्यांना भेटायला गेली सोनाक्षी सिन्हा!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीच्या अचानक लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर सातत्याने स्टार्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर आता त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. २१ ते २३ जून  दरम्यान हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच सोनाक्षी लग्नाआधी सासरच्यांना भेटली आहे, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो तुफान व्हायरल होत आहे.

सोनाक्षी सिन्हाने रविवार सासू-सासऱ्यांसोबत घालवला. या खास भेटीचा फोटो झहीर इक्बालच्या बहिणीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीरच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांमध्ये एक खास बॉन्डिंग दिसत आहे. या फोटोत सोनाक्षी सासू, सासरे इक्बाल रतनसी, झहीर आणि नणंद सनम रतनसी सोबत दिसत आहे. तर झहीर आई आणि वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसत आहे. तर सोनाक्षी सासऱ्यांच्या शेजारी उभी राहून क्यूट स्माईल देताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sonakshi Sinha Zaheer Iqbal
Sonakshi Sinha Zaheer Iqbal

कोण आहे झहीर इक्बालचे कुटुंब?

झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी हे ज्वेलर्स आणि बिझनेसमन आहेत. त्याची आई गृहिणी आहे. झहीरची बहीण सनम सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. संजय लीला भन्साळी यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हीरामंडी' या चित्रपटातील बहुतांश स्टार्सना सनमने स्टाईल केले आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हाचाही समावेश आहे. सनमने हार्ट इमोजीसह फॅमिली फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याचा एक लहान भाऊ आहे, जो संगणक अभियंता म्हणून काम करतो. झहीरचे कुटुंब सलमान खानच्या कुटुंबियांच्या खूप जवळ चे आहे.

कुठे असेल लग्नाची पार्टी?

याच महिन्यात ही जोडी लग्न बंधनात अडकणार आहे. बॉलिवूडच्या कलाकारांसाठी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची पार्टी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट ‘बुरुज’मध्ये पार पडणार आहे. ‘हीरामंडी’च्या कलाकारांपासून ते दिग्दर्शक संजय लीला भन्साळींपर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावण्यासाठी येणार आहेत. एकाकीकडे सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे तिच्या कुटुंबाकडून आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या प्रतिक्रियेवरून असे वाटत आहे की, सोनाक्षीने घरात कुणाला तिच्या लग्नाची कल्पना दिली नसावी, अथवा तिच्या कुटुंबाकडून या लग्नाबाबत नाराजी असावी.

WhatsApp channel