बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल सध्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने लग्न केले. तसेच लग्नानंतर बॉलिवूड कलाकारांसाठी पार्टी आयोजित केली होती. पण लग्नाला सोनाक्षीच्या जवळचे काही मोजकेच लोक होते. आता एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने कुटुंबातील एका व्यक्तीमुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह करावा लागले असे सांगितले आहे.
सोनाक्षीने नुकताच 'गाल्टा इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिच्यावर बिग फॅट इंडियन वेडिंग करण्यासाठी दबाव नव्हता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सोनाक्षीने उत्तर देत, 'बिग फॅट इंडियन वेडिंग करण्याचा दबाव होता, पण आम्हाला कशा प्रकारचं लग्न करायचं होतं याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट होतो. थोड्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊन माझ्या भावाचे (कुश) लग्न आठवले, तर तुम्हाला आठवेल की त्याने धुमधडाक्यात लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभाला पाच ते आठ हजार लोक उपस्थित होते. तेव्हाच मी आईला सांगितलं की, माझं लग्न असं होणार नाही.' सोनाक्षीचा भाऊ कुशने २०१५मध्ये लग्न केले. त्याने तरुणा अग्रवालसोबत लग्न केले.
पुढे सोनाक्षी म्हणाली, "हा दिवस आमच्या आयुष्यात एकदाच येतो म्हणून आम्हाला हा दिवस खूप खास बनवायचा होता. त्यामुळे आम्ही हवं तसं लग्न केलं. असे काही मित्र होते जे आमच्या निर्णयावर खूश नव्हते. त्यांना हुमासारखे आणखी फंक्शन्स हवे होते. माझा मित्र आणि स्टायलिस्ट मोहितही 'मला तुला पाच आउटफिट्स द्यायचे आहेत' असे म्हणत माझ्या मागे लागला होता. पण मी एकच आउटफिट घेतला."
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी
सोनाक्षी आणि झहीरने सात वर्षे एकमेकांना डेट केले. ते दोघे एकत्र राहात होते. आता अखेर त्यांनी लग्न केले आहे. सोनाक्षीचा भाऊ आणि कुटुंबातील काही सदस्यांचा या लग्नाला नकार होता. सोनाक्षीचा भाऊ कुश लग्नाला गैरहजर होता. तो केवळ सोनाक्षीच्या रिसेप्शनला पोहोचला होता. सोनाक्षीच्या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. तिने दादर येथील शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये हे रिसेप्शन ठेवले होते. खास करुन हनी सिंगची चर्चा रंगली होती.