बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता जहीर इक्बावशी लग्न केले आहे. एकीकडे सोशल मीडियावर लोक तिच्या आणि झहीरच्या लग्नाला लव्ह-जिहाद असं नाव देत आहेत. त्या दोघांना ट्रोल केले. दुसरीकडे ती तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. सोनाक्षीने चाहत्यांसोबत लग्नाचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. नुकताच सोनाक्षीने जहीरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोनाक्षी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जहीर एका मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. त्याच्या हातात सोनाक्षीचे सँडल दिसत आहेत. तो चालत असताना सोनाक्षीने पाठीमागून व्हिडीओ काढला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनाक्षीने 'जेव्हा तुम्ही ग्रीन फ्लॅग बॉयशी लग्न करता' असे कॅप्शन दिले आहे. सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत जहीरचे कौतुक केले आहे.
वाचा: 'जुनं फर्निचर' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? मग ही बातमी नक्की वाचा
सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता सात दिवस झाले आहेत. शत्रुघ्न यांच्या घरी दोघांनी नोंदणीकृत विवाह केला होता, ज्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. सलमान खान, रवीना टंडण, संगीता बिजलानी, काजोल, अनिल कपूर, चंकी पांडे यांच्यासह अनेक सिनेसृष्टीतील मान्यवर रिसेप्शनला पोहोचले होते. सोनाक्षीच्या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. चाहत्यांनी कमेंट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांचे वडील रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून पप्पा (शत्रुघ्न) यांना ताप आणि अशक्तपणा येत होता, त्यामुळे डॉक्टरांना त्यांची तपासणी करता यावी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शत्रुघ्न यांना आज (सोमवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
वाचा: मिथिलाच्या आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री, 'सुख कळले' मालिकेत रंजक ट्विस्ट
संबंधित बातम्या