सगळ्यांनी बोलून झाल्यावर शेवटी सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल बोलली! म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सगळ्यांनी बोलून झाल्यावर शेवटी सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल बोलली! म्हणाली...

सगळ्यांनी बोलून झाल्यावर शेवटी सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल बोलली! म्हणाली...

Jul 16, 2024 04:03 PM IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर पहिल्यादाच एका मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल आणि पतीबद्दल भाष्य केलं आहे.

 सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल बोलली! म्हणाली...
सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल बोलली! म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. एकीकडे सोनाक्षीने तिच्या मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केलंय. तर, दुसरीकडे तिचा नवा चित्रपट ‘काकुदा’ नुकताच रिलीज झाला आहे. या दरम्यान अभिनेत्री वेगवेगळ्या मुलाखती देताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने पहिल्यांदाच तिच्या लग्नाविषयी थेट भाष्य केलं आहे. सोनाक्षीच्या लग्नावर अनेकांनी टीका केली होती. तिच्या लग्नाला काही लोकांनी ‘लव्ह जिहाद’चे नाव दिले होते. तिचे भाऊ आणि कुटुंब देखील या लग्नामुळे नाराज असल्याचे म्हटले जात होते. यामुळे सोनाक्षी ट्रोल देखील झाली. मात्र, आता तिने आपल्या लग्नावर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी आपले नाते तब्बल सात वर्षे सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. मात्र, आता ही जोडी लग्न बंधनात अडकली आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याविषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली की, ‘मला वाटते की माझ्या लग्नाला सगळ्यांनीच हजेरी लावली होती. झहीर आणि मी सिंगापूरला गेलो होतो, तिथे कॉफी शॉपमध्ये लोक आम्हाला पेस्ट्रीसह शुभेच्छा देत होते. आमच्याकडे येऊन आमच्याशी बोलणारे प्रत्येकजण म्हणत होते की, आम्ही तुझ्या लग्नाचे सगळे व्हिडीओ पाहिले आहेत. म्हणजे प्रत्येकजण आमच्या मोठ्या दिवसाचा एक भाग बनले हे खरंच खूप छान आहे.’

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला केवळ दोन आठवडे झाले आणि तिने ‘झी ५’च्या ‘काकुदा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. यावेळी कामाबद्दल आणि आपल्या संसाराबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, ‘कामावर परत आल्यानंतर खूप आनंद होत आहे. मी कुठेही गेलेच नव्हे, ब्रेक घेतला नव्हता, असं वाटतं आहे.’

Gharoghari Matichya Chuli: संजना आणि ऐश्वर्या मिळून जानकीच्या मेहंदीची वाट लावणार! मालिकेत पुढे काय घडणार?

लग्नापूर्वी या जोडीने अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आहे. त्यामुळे लग्नानंतर आयुष्यात काही बदल झाला आहे का?  या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली की, ‘खरंतर हे आयुष्यही खूप छान आहे. मला वाटतं की, आता सध्या मला माझ्या जिवलग मित्राबरोबर रोज राहायला मिळतं आहे. याखेरीज माझ्या आयुष्यात खरंच फारकाही बदललेलं नाही. आणि हा आयुष्याचा सर्वात मजेशीर भाग आहे. मी खरंच खूप लकी आहे. त्याच्यासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं.’

सोनाक्षी म्हणाली की, आमच्या लग्नात त्यांचे पाहुणे आणि आमचे पाहुणे असं काही वेगळं नव्हतं. आम्हा दोघांचेही मित्र कॉमन असल्याने सगळे एकत्रच होते. या सगळ्यादरम्यान, 'काकुदा' या हॉरर कॉमेडीचित्रपटातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायला मिळाल्याचा मला आनंद झाला, असं सोनाक्षी म्हणाली.  ‘एक अभिनेत्री म्हणून मी यापूर्वी कधीही हा जॉनर केला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्ताने मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले’, असे देखील ती म्हणाली.

Whats_app_banner