बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी पती जहीर इक्बालसोबत डिनर डेट करुन रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. सोनाक्षी कारच्या दिशेने जाते तर जहीर चाहत्यांना काही लोकांशी बोलत उभा राहातो. दरम्यान, रेस्टॉरंट बाहेर काही फोटोग्राफर्स असतात. त्यांना सोनाक्षी लांब जाण्यास सांगते. "अरे मला घरी जाऊ दे यार" असे बोलून ती गाडीत बसते. दरम्यान, सोनाक्षीने पतीसाठी वापरलेले शब्द ऐकून नेटकरी चिडले आहेत.
सोनाक्षी पाठोपाठ जहीर इक्बालही त्याच गाडीत जाऊन बसतो. कारमध्ये बसण्यापूर्वी झहीर इक्बाल पॅपराझींना फोटोसाठी पोझ देतो. जहीर गाडीजवळ येतो. सोनाक्षी जहीरसोबत काही तरी बोलताना दिसते. तसेच जहीर गाडीत बसत नसल्यामुळे सोनाक्षी 'अबे चल' असे बोलताना दिसत आहे. तसेच सोनाक्षीने पॅपराझींना दिलेली वागणूक पाहून नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी सोनाक्षीला चांगलेच सुनावले आहे.
व्हिडीओपाहून काही नेटकऱ्यांनी सोनाक्षीला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका सोशल मीडिया युजरने लिहिले, 'सोनाक्षी आबे चल बोलली नाही' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'सोना खान' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'सोनाक्षी जहीरला अबे चल असे का म्हणाली' असा प्रश्न विचारला आहे. एका यूजरने तर 'हे कलयुग आहे की शूर्पणखा' असे म्हणत कमेंट केली आहे. काहींनी तर सोनाक्षीला अजिबात शिस्त नाही असे देखील म्हटले आहेय सध्या सोशल मीडियावर सोनाक्षीचे वागणे पाहून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर खानशी लग्न केले. जवळपास सात ते आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. खरं तर सोनाक्षी सिन्हाच्या घराचं नाव रामायण असून तिचे वडील आणि कुटुंबातील बहुतांश सदस्यांची नावे रामायणातील पात्रांच्या नावावर आहेत. त्यामुळे सोनाक्षीने लग्न करताच सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाली होती. तसेच सोनाक्षीने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर लग्नाचे रिसेप्शन दिले होते. आता सोनाक्षी आणि जहीर एकत्र आनंदाने संसार करताना दिसत आहेत.