Video: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस

Video: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 24, 2024 08:57 AM IST

सोनाक्षी आणि जहीरने लग्नानंतर एका रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड कलाकारांनी धमाल केल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा रिसेप्शन व्हिडीओ
sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा रिसेप्शन व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या रजिस्टर मॅरेजनंतर ग्रँड रिसेप्शनचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. लग्न समारंभात हे स्टार कपल जगाकडे दुर्लक्ष करून एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले. जहीरने सोनाक्षीचा हात पकडून डान्स केला आहे. तर अनिल कपूर हे जमीनीवर बसून डान्स करत असल्याचे दिसत आहे. सोनाक्षी आणि जहीरच्या रिसेप्शन पार्टीमधील काही व्हिडीओ समोर आले आहेत.

बॉलिवूड कलाकारांची धमाल

सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि जहीरच्या रिसेप्शनचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये अनिल कपूर अक्षरश: जमीनीवर बसून डान्स करताना दिसत आहेत. तर अभिनेत्री काजोल ही डीजेवर सोनाक्षीसोबत डान्स करत आहे. दुसरीकडे हनी सिंग या कार्यक्रमात गाणे गाताना दिसत आहे. दरम्यान, सोनाक्षी आणि जहीरचा देखील डान्स व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा : सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीची पोस्ट

जहीरचा खास डान्स

या डान्स व्हिडिओमध्ये जहीर आपल्या सोनासाठी परफॉर्म करताना दिसत आहे. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाच्या आउटफिट परिधान केल्याचे दिसत आहे. तर सोनाक्षीने लाल रंगाची साडी, कपाळी सिंदूर, हातात लाल बांगड्या घातल्या होत्या. दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.
वाचा : कलाने काजोलला केले निर्दोषी सिद्ध, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आठवडाभरात काय घडले?

रॅपर हनी सिंगने गायले गाणे

हनी सिंगने सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये गाणे गात सर्वांना वेड लावले आहे. त्याचा हा गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोनाक्षी आणि हनी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. अनेकदा हनीने सोनाक्षीचे सर्वांसमोर आभार मानले आहेत.
वाचा : 'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग

 

बॉलिवूड कलाकारांची हजेरी

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सलमान खान, काजोल दिसले. तसेच अनिल कपूर, रेखा, आदित्य रॉय कपूर, हीरामंडी कलाकार : शर्मीन सेहगल, संजीदा शेख, ऋचा चड्ढा, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ आणि इतर काही कलाकार दिसले. पण या सगळ्यात बच्चन कुटुंबीय आणि धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील कोणीही दिसले नाही.
वाचा : मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले

Whats_app_banner