गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल हे लग्नबंधनातअडकले आहेत. त्यांनी रजिस्टर पद्धतीने विवाह केला आहे. सोनाक्षी आणि जहीरला वर आणि वधूच्या लूकमध्ये पाहण्यासाठी सर्वजण आतुर होते. आता अखेर त्यांच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच जहीरने सोनाक्षीला सर्वांसमोर किस केले आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल या क्यूट कपलचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये जहीरने पेपरवर सही केल्यानंतर सोनाक्षीला मिठीत घेतले आहे. त्यानंतर तिच्या गालावर किस केले आहे. या जोडप्याने कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत एकमेकांशी लग्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत अनेकांनी दोघेही मेड फॉर इच अदर असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने दोघेही सुंदर दिसत आहेत.
वाचा : सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीची पोस्ट
सोनाक्षीने लग्नात पांढरी साडी नेसली आहे. ही तिच्या आईची आहे. तिच्या आईने ही साडी स्वत:च्या लग्नात नेसली होती. सोनाक्षीने पांढऱ्या साडीवर पांढरे ब्लाऊज घातले आहे. तसेच केसांचा बन केला असून त्यावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचा गजरा माळला आहे. सोनाक्षीने गळ्यात सुंदर ज्वेलरी घातली आहे. तसेच कानात झुमके घातले आहेत. दुसरीकडे जहीरने सोनाक्षीला मॅचिंग म्हणून पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यावर हातात सोन्याचे घड्याळ घातले आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि जहीर हसताना दिसतात. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार दिसत आहे. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी ठेवली. या पार्टीला काही मोजकेच लोक हजर असल्याचे दिसत आहे. काही बॉलिवूड कलाकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत.
सोनाक्षीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकताच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकरली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या