Sonakshi Sinha And Zaheer Iqbal: नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजच्या नव्या एपिसोडने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि हटके किस्से शेअर केले आहेत. या खास एपिसोडमध्ये सोनाक्षीच्या आई-वडिलांनाही उपस्थित लावली होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या सहभागाने शोला अधिक रंगत प्राप्त झाली.
या शोमध्ये कपिल शर्मा याने आपल्या हसमुख अंदाजाने सगळ्यांचे स्वागत केले. यानंतर त्याने या मंचावर सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या आई-वडिलांचे स्वागत केले. यानंतर मंचावर धमाकेदार आणि रंजक किस्स्यांची मैफल सुरू झाला. या दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाक्षी आणि जहीर यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या लग्नाबद्दल कधी आणि कसे कळले होते, हा प्रश्न विचारला होता. यावेळी जहीर इक्बालने अतिशय रंजक किस्सा शेअर केला आहे.
जहीर इक्बाल याने शत्रुघ्न सिन्हा कुटुंबाशी नवे नातेसंबंध जोडत असताना आपल्याला सुरुवातीला थोडी भीती वाटत असल्याचे म्हटले. जहीर मजेशीर पद्धतीने सांगितले की,‘शत्रुघ्न सिन्हा यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या आजूबाजूला ६-८ अंगरक्षक उभे होते,ज्यामुळे त्याला आधीच थोडा भीती वाटत होती. त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांची सुरक्षा खूपच तगडी होती. आता इतकं सगळं पाहिल्यानंतर लग्नात तिचा हात मागण्याचे धाडस कसं करायचं?, असा विचार मनात आला.’
जहीरने शेवटी सोनाक्षीसोबतच्या नात्याबद्दल आणि विवाहाबद्दल तिच्या वडिलांशी बोलण्याचा निर्णय घेतला. तो सोनाक्षीला म्हणाला की,‘मला वाटतं,आता आपण आपल्या पालकांशी लग्नाचं बोलायला हवं.’ सोनाक्षीने त्याला म्हणालीकी, तूच माझ्या’ पालकांशीही बोल. यावर जहीरने उत्तर दिले की,‘मी आधीच माझ्या वडिलांशी बोललो आहे, त्यांना रे केलं आहे. आता तू तुझ्या पालकांशी बोल.’ सोनाक्षीने नंतर तिच्या वडिलांशी यावर बोलण्याचं ठरवलं. सोनाक्षीने वडिलांना आपल्या लग्नासाठी परवानगी मागताच त्यांनी आनंदाने लगेच होकार दिला. अतिशय आनंदाने होकार मिळाल्यावर दोघेही खूप खुश झाले. या नंतर दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली. या शोच्या एकूणच हसऱ्या आणि हलक्या वातावरणामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. सोनाक्षी आणि झहीरच्या गोड आणि मजेशीर कथेने सगळ्यांचेच मनोरंजन झाले.