मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद; ५०हून कमी लोकांमध्ये होणार सोहळा!

‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद; ५०हून कमी लोकांमध्ये होणार सोहळा!

Jun 19, 2024 08:48 AM IST

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाचे सोहळेही सुरू झाले आहेत. जाणून घेऊया सोनाक्षी आणि झहीरचा हळदी सोहळा कधी होणार आहे.

‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद
‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी लवकरच तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी सोनाक्षीने तिच्या गर्ल गँगसोबत बॅचलरेट पार्टी केली होती. सोनाक्षीने सोमवारी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्याच्या बॅचलर पार्टीचे असल्याचे सांगितले जात आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा बॉलिवूड अभिनेत्री आणि सोनाक्षीची मैत्रीण हुमा कुरेशी आणि झहीर इक्बालची बहीण सनमसोबत दिसली होती. सोनाक्षी सिन्हाच्या घरीही लग्न समारंभाची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर सोनाक्षीच्या हळदी सोहळ्याची तारीखही समोर आली आहे.

हळदीचा सोहळा कधी आणि कुठे होणार?

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा हळदी सोहळा २० जून रोजी पार पडणार आहे. सोनाक्षीचा हळदी सोहळा तिच्या वांद्रे येथील राहत्या घरी पार पडणार आहे. या समारंभात जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, या सोहळ्याला ५०पेक्षा कमी लोक उपस्थित राहणार आहेत.

वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा प्रेमात पडले होते आशिष विद्यार्थी; लग्नगाठही बांधली! वाचा अभिनेत्याविषयी

सोनाक्षी सिन्हाच्या हळदीची थीम पिवळ्या-गुलाबी रंगाची नाही!

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नसमारंभात जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीने तिच्या हेल्दी सेरेमनी डेकोरबाबत प्लॅनरसोबत काही कल्पना शेअर केल्या आहेत. सोनाक्षीची हळद टिपिकल पिवळ्या आणि गुलाबी थीमची नसेल. सोनाक्षीला मुख्य प्रवाहातील सजावट टाळायची आहे. त्यामुळे सोनाक्षी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे काहीतरी हटके करताना दिसणार आहे. चाहत्यांना तिच्या फोटोंची आतुरता लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कधीकाळी बॅकग्राउंड डान्सर होती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी

सोनाक्षी लग्न कधी करणार?

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल २३ जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी सोनाक्षीच्या लग्नावर तिचे कुटुंबीय खूश नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. सोनाक्षीला इन्स्टाग्रामवर तिचा भाऊ आणि तिची आईही फॉलो देखील करत नाहीयत.

२३ जून रोजी सोनाक्षी आणि झहीर इक्बाल मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये लग्नाची पार्टी देणार आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक मोठे चेहरे पाहायला सामील होताना पाहायला मिळणार आहेत. सोनाक्षीच्या पार्टीत रॅपर हनी सिंह, बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लन, संजय लीला भन्साळी असे अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.

WhatsApp channel