गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. सोनाक्षी २३ जून रोजी बॉयफ्रेंड जहीर इकबालशी लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात होते. पण दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर लग्नाची पत्रिका समोर आली आहे. यावरुन दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे.
सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. ही पत्रिका व्हिडीओ स्वरुपात आहे. या व्हिडीओला सोनाक्षी आणि जहीरने आवाज दिला आहे. त्यामध्ये ते बोलताना दिसत आहेत की आम्ही आमच्या ७ वर्षाच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लग्न करत आहोत. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी नक्की या.
वाचा: सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या या पुत्रिकेनुसार, जहीर आणि सोनाक्षीच्या लग्नाची पार्टी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील बास्टियन या रेस्टॉरंटमध्ये होणार आहे. हे हॉटेल मुंबईतील दादर येथे आहे. या व्हिडीओमध्ये पार्टीसाठी ड्रेस कोर्ड देखील ठेवण्यात आला असल्याचे सांगितले आहे. पाहुण्यांनी लाल रंगाचे कपडे परिधान करु नयेत असे सांगण्यात आले आहे. सोनाक्षी आणि जहीर हे २३ जून रोजी रजिस्टर लग्न करणार आहेत.
वाचा: 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
आमच्या सगळ्या टेक सेवी आणि जासूस मित्रमैत्रिणींना नमस्कार, गेल्या सात वर्षांपासून आम्ही एकमेकांसोबत आहोत. आता ती वेळ आली आहे की आम्ही एकमेकांचे रुमर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड पासून पुढे जाण्याची. ती वेळ आली आहे. एकमेकांचे प्रेमी बनण्यापासून ते एकमेकांचे पती आणि पत्नी होण्यापर्यंतची. पण हा आनंद तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे २३ जून रोजी तुम्ही जे काही करत असाल ते बाजूला ठेवून आमच्या पार्टीमध्ये सहभागी व्हा.
वाचा: 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
संबंधित बातम्या