Viral Video: पॅपराझींच्या 'या' कृत्यावर संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली 'बास आता'
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: पॅपराझींच्या 'या' कृत्यावर संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली 'बास आता'

Viral Video: पॅपराझींच्या 'या' कृत्यावर संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली 'बास आता'

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 12, 2025 01:45 PM IST

Viral Video: सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षीवर बरीच टीका झाली होती. आता सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे बरीच चर्चेत असते. अभिनेत्रीच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. दरम्यान, सोनाक्षीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात ती प्रचंड संतापलेली दिसत आहे. सोनाक्षी अचानक पॅपराझींवर आपला राग काढताना दिसते. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

नेमकं काय झालं?

सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ ग्लॅमरमने त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनाक्षी मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या व्हिडिओमध्ये सोनाक्षीने ब्लॅक कलरचे शिमरी जॅकेट परिधान केले आहे. यासह अभिनेत्रीने ट्यूब टॉप कॅरी केला आहे. तिने मॅचिंग बॅगी पँटही घातली होती, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. यावेळी सोनाक्षी आपल्या मैत्रिणीशी बोलताना इव्हेंटमधून बाहेर येताच पॅप्स तिचा पाठलाग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हे पाहून त्यांना प्रचंड राग येतो.

काय म्हणाली सोनाक्षी?

पाठलाग करणाऱ्या फोटोग्राफर्सला सोनाक्षी शांतपणे बाजूला व्हायला सांगते. पण त्यांना ते पटत नाही. ते पुन्हा सोनाक्षीच्या पुढे पळू लागतात. ते पाहून सोनाक्षी फोटोग्राफर्सवर चिडते. ती हात जोडून फोटो काढण्यास नकार देते. ती फोटोग्राफर्सला सतत म्हणते, 'तेवढंच, बास आता, इथून जा, प्लीज जा.' तरीही ते ऐकत नाहीत. सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण त्यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
वाचा: लेकाचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानने सोडले धूम्रपान, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

सोनाक्षी सिन्हाने २०२४ मध्ये अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नावरून बराच वाद झाला होता. सोनाक्षी अनेकदा पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. नुकतेच त्यांनी 30 डिसेंबर रोजी त्यांच्या साखरपुड्याला दोन वर्षे पूर्ण केली. यावेळी अभिनेत्रीने फोटोही पोस्ट केले होते, जे खूप आवडले होते.

 

Whats_app_banner