‘सन ऑफ सरदार’ सिनेमाच्या निर्मात्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डिवायडरला गाडी ठोकल्यामुळे १८ वर्षांच्या मुलाचे निधन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाच्या निर्मात्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डिवायडरला गाडी ठोकल्यामुळे १८ वर्षांच्या मुलाचे निधन

‘सन ऑफ सरदार’ सिनेमाच्या निर्मात्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डिवायडरला गाडी ठोकल्यामुळे १८ वर्षांच्या मुलाचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 27, 2024 11:48 AM IST

चित्रपट निर्माते अश्विनी धीर यांच्या १८ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

अश्विनी धीर, जलज धीर
अश्विनी धीर, जलज धीर

'अतिथी तुम कब जाओगे' आणि 'सन ऑफ सरदार' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा १८ वर्षीय मुलगा जलज धीर याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलजचा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. जलजचा मित्र साहिल मेंढा दारू पिऊन गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला.

मित्राला झाली अटक

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, जलजचा मित्र १२० ते १५०च्या स्पीडने गाडी चालवत होता. त्यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात जलज आणि त्याचा मित्र सार्थक कौशिक यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी जेडन जिमी यांनी या घटनेची माहिती विलेपार्ले पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कार चालवणाऱ्या साहिल मेंढा याला अटक केली.
वाचा: मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...

नेमकं काय घडलं?

जलज आणि त्याचे मित्र गोरेगाव पूर्वेकडील असलेल्या घरी एकत्र जमले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चौघांनी व्हिडिओ गेम खेळले, त्यानंतर लाँग ड्राइव्हवर जाऊन वांद्रे येथील सिगडी रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि पहाटे ४.१० वाजता गोरेगाव पूर्वेकडे रवाना झाले. त्याचवेळी त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटले आणि सर्व्हिस रोड ते पूल यांच्यातील दुभाजकावर आदळले. त्यानंतर जलज व सार्थक यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

Whats_app_banner