बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेकदा मुलाखतींमध्ये सलमान आणि त्याच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिसली आहे. आता सोमीने सलमानबद्दल असे विधान केले आहे, जे ऐकून अभिनेत्याचे चाहतेही आश्चर्यचकित होतील. सलमानचे इतर एक्स गर्लफ्रेंडसोबत चांगले संबंध असताना सोमीशी का नाहीत? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर सोमीने लॉरेन्सला सलमानपेक्षा सरस म्हटलं आहे. ते ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत. चला जाणून घेऊया सोमी नक्की काय म्हणाली.
सोमी अलीने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमघ्ये तिला सलमानचे इतर एक्स गर्लफ्रेंडसोबत चांगले संबंध आहेत. मग तुझ्यासोबत का नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याविषयी बोलताना सोमी म्हणाली, 'त्याचे त्यांच्याशी असलेले नाते योग्य आहे. कारण त्याने माझ्याशी तशीच वागणूक दिली जशी त्याने कुणालाही दिली नाही. संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांच्यासोबत त्याने माझ्यासोबत जे काही केलं आहे, त्याच्या अर्धही केले नाही.'
ऐश्वर्याबद्दल बोलताना सोमी अली म्हणाली, 'सलमानने ऐश्वर्याला खूप वाईट वागणूतक दिली होती. त्याने तिच्यासोबत अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. मला वाटतं त्याने ऐश्वर्याच्या खांद्यालाही फ्रॅक्चर केलं आहे. पण त्याने कतरिनासोबत काय केलं हे मला माहित नाही.'
या मुलाखतीमध्ये सोमीने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी करत धक्कादायक विधान केले आहे. सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी करत सोमी म्हणाली, सलमानने माझ्यासोबत जे केले, त्यावरून मी असे म्हणू शकते की बिश्नोई त्याच्यापेक्षा चांगला आहे. सलमानने एकदा मला इतके मारले की घरातील मदतनीसने ठार न मारण्याची विनंती केली. तब्बूलाही त्या जखमा दिसल्या.'
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य
सोमी पुढे म्हणाली होती, 'सलमानने मला इतके मारले की माझी पाठदुखी सुरु झाली होती. तब्बूने माझी अवस्था पाहिली होती. तिच्या समोर मी खूप रडले होते. पण सलमान मला पुन्हा भेटायला आला नाही.' सोमीने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की ती एक पुस्तक लिहित आहे. या पुस्तकात सलमानसोबत असलेल्या नात्यावर ती अनेक गोष्टी लिहिणार आहे.