Tejashri Pradhan Cryptic Post : प्रेक्षकांची लाडकी 'जान्हवी' म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतीच 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडून सगळ्यांनाच आश्वर्याचा धक्का दिल होता. एकीकडे प्रेक्षक हाच धक्का पचवत असताना आता दुसरीकडे तिने एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. 'चिअर्स कधी कधी वेळच्या वेळी बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही.' तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर आता सगळेच तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानने साकारलेली मुक्ताची भूमिका घराघरांत पोहोचली होती. तिच्या अभिनयाने ही भूमिका फारच गाजली आणि प्रेक्षकांच्या मनात तिने हक्काची जागा मिळवली आहे. 'जान्हवी' आणि 'शुभ्रा' या पात्रांसोबतच तिच्या 'मुक्ता' या पात्रानेही चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. परंतु, आता या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसणार आहेत. स्वरदा ठिगळे या हिंदी आणि मराठी मालिकांमधील एक चर्चित चेहरा आहे. स्वरदा या आधी विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र, तेजश्रीने मालिका सोडल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत.
या दरम्यान तेजश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने या निर्णयावर भाष्य केले आहे. तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर प्रश्न विचारले आहेत, की अचानक मालिका का सोडली? अनेकांनी तिला तिच्या निर्णयाचं कारण विचारलं आहे, तर काहींनी तिच्या निर्णयाला योग्य ठरवले आहे आणि तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा निर्णय नेमका कशामुळे झाला याबद्दल तिने थोडं अस्पष्टता ठेवली असली तरी, अनेकांना तिचा निर्णय आदर्श वाटत आहे.
तेजश्री प्रधानने घेतलेला निर्णय तिच्या करिअरच्या पुढील टप्प्याशी संबंधित असावा, असं अनुमान व्यक्त केलं जात आहे. कलाकारांच्या जीवनात अशा निर्णयांचा समावेश असतो, कारण त्यांना नवीन संधी मिळवण्याचा आणि स्वीकारण्याचा अधिकार असतो, असे चाहते म्हणत आहेत. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील तिच्या अनुपस्थितीने तिच्या चाहत्यांना तगडा धक्का दिला असला तरी, त्या जागी येणारी स्वरदा ठिगळे देखील चांगली भूमिका साकारेल, अशी आशा प्रेक्षकांकडून दर्शवली जात आहे.
संबंधित बातम्या