चाहते अनेकदा आपल्या आवडत्या गायकाच्या, रॅपरच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी उत्सुक असतात. लाइव्ह गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ते तुफान गर्दी करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध गायक गाणे गात आहे. हे गाणे गात असताना चाहत्यांच्या गर्दीमधील एकाने त्याच्यावर बूट फेकून मारला. हा बूट गायकाच्या थेट तोंडावर बसला. त्यानंतर जे काही घडले ते पाहून सर्वजण चकीत झाले
विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' हे गाणे चांगलेच गाजले आहे. केवळ चाहतेच नाही तर स्टार्सनीही या गाण्यावर भरपूर रिल्स बनवल्या होत्या. अशातच आता 'तौबा तौबा' या गाण्याचा गायक करण औजलाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. करणवर लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान एका चाहत्याने त्याच्यावर बूट फेकला. यानंतर कॉन्सर्टमध्ये बराच गदारोळ झाला आणि या कृत्याने गायक चांगलाच भडकला. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
'तौबा तौबा' या गाण्यातील गायक करण औजलासोबत घडलेला प्रसंग पाहून चाहते खूप दु:खी झाले आहेत. खरं तर करणचा लाईव्ह कॉन्सर्ट हा भारतात नसून लंडनमध्ये होता. हा कॉन्सर्ट सुरू असताना गर्दीतून कुणीतरी त्याच्यावर बूट फेकून मारला. हा बूट थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. त्यानंतर करणला राग अनावर झाला. त्याने शो मध्येच थांबवला आणि रागाच्या भरात शिवीगाळ केली. त्यानंतर करण माईक घेतो आणि बोलतो, "मी इतकं वाईट गात आहे का की लोक बूट फेकतात? हिंमत असेल तर थेट स्टेजवर येऊन माझ्याशी बोला." सध्या सोशल मीडियावर करणचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
करण औजला हा पंजाब चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आहे. करणने आतापर्यंत अनेक हिट पंजाबी गाणी दिली आहेत. तर करणचं बॉलिवूड गाणं 'तौबा तौबा' देखील चाहत्यांना खूप आवडलं आहे. हे गाणं टॉपवर होतं. 'तौबा तौबा' या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत २४१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला अजूनही खूप पसंती मिळत आहे. अलीकडेच करण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होता. आता त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घडलेल्या घटनेचा सर्वजण निषेद करत आहेत. अनेकांनी कमेंट करत करणला धीर दिला आहे.