मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brand Marathi Movie: नवनाथ निकमच्या 'ब्रँड'मध्ये 'जस्ट सुल'ची एंट्री; नव्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता!

Brand Marathi Movie: नवनाथ निकमच्या 'ब्रँड'मध्ये 'जस्ट सुल'ची एंट्री; नव्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 05, 2023 04:23 PM IST

Just Sul In Brand Marathi Movie: 'जस्ट सुल' एका मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक नवनाथ निकमच्या आगामी चित्रपटात जस्ट सुल झळकणार आहे.

Just Sul In Brand Marathi Movie
Just Sul In Brand Marathi Movie

Just Sul In Brand Marathi Movie: सध्या मराठी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या विषयांवरचे धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हटके अशा चित्रपटांची लाट आलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक वेगवेगळे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठी आणि बॉलिवूड कलाकारच नव्हे, तर आता सोशल मीडिया इन्फ्लुएंसरलाही मराठी चित्रपटांची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले चेहरे आता मराठी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अनेक मराठी चित्रपटांमध्ये हे मीडिया इन्फ्लुएंसर लहानसहान भूमिका साकारून मोठा पडदा गाजवतात. आता मिलियन व्ह्यूज मिळवणारा 'जस्ट सुल' लवकरच मोठा पडदा गाजवायला सज्ज होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकचा जिगरी दोस्त अशी ओळख असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जस्ट सुलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. आता हा जस्ट सुल एका मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक नवनाथ निकमच्या आगामी चित्रपटात जस्ट सुल झळकणार आहे. नवनाथ निकमने आजवर अनेक हिट मराठी गाण्यांच्या दिग्दर्शातून आपले नाव कमावले आहे. आता नवनाथ निकम त्याचा आगामी 'नवस्त्य एंटरटेनमेंट' निर्मित 'ब्रँड' हा मराठमोळा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे.

'ब्रँड' या रोमँटिक मराठी चित्रपटात 'जस्ट सुल'सोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, चित्रपटात जस्ट सुलची धमाल मस्ती प्रेक्षकांना नक्कीच मोहिनी घालणार आहे. याबाबत बोलताना चित्रपटाचा दिग्दर्शक नवनाथ निकम याने म्हटलं की, ''ब्रँड' हा माझा आगामी रोमँटिक चित्रपट लवकरच मोठया पडद्यावर येत आहे. चित्रपटात प्रेक्षकांना धमाल, मस्ती व रोमान्स अनुभवायला मिळेल. तसेच, जस्ट सुलच्या एन्ट्रीने चित्रपटाची रंगत दुप्पट झालेली पाहायला मिळेल. आम्ही सर्वांनी मिळून केलेली धमाल अर्थातच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करेल. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा माझा अनुभव कायम मला लक्षात राहील.' 'ब्रँड' हा आगामी प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २० डिसेंबर २०२४ला मोठया पडद्यावर प्रदर्शित होईल.

IPL_Entry_Point

विभाग