अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला गेल्या महिन्यात सुरू झाली. हैदराबादमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा साखरपुडा पार पडला. ते डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या निमंत्रणाचे अनेक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत. तसेच या निमंत्रण पत्रिकेसोबत त्यांनी पाहुण्यांना एक गूडी बॅग दिली आहे. आता या गूडी बॅगमध्ये काय आहे चला जाणून घेऊया...
नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाच्या कार्डवर भारताच्या दक्षिण भागातील पारंपारिक घटकांचा समावेश होता. कार्डवर मंदिर, दिवे, गाय आणि घंटा दिसत होत्या. वधू-वरांच्या नावासोबत त्यांच्या कौटुंबिक तपशीलांचाही समावेश होता. लग्नाची तारीख ४ डिसेंबर २०२४ आहे. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सध्या सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे.
लग्नाच्या पत्रिकेसोबत शोभिता आणि नागा चैतन्य यांनी गुडी बॅग दिली आहे. कार्डसोबत पाहुण्यांना एक टोपलीही देण्यात आली, ज्यात काही स्नॅक्सची पाकिटे, कपडे, फुले आणि स्क्रॉल सह अनेक वस्तूंचा समावेश होता. शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण त्यांच्या लग्नातील कार्ड आणि गुडीबॅगचा फोटो व्हायरल झाला आहे.
गेल्या महिन्यात सोभिताने इन्स्टाग्रामवर पसुपू दानचदम सोहळ्यातील मनमोहक फोटो शेअर केले होते. या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिलं होतं की, 'गोधूमा राय पसुपू दानचडम आणि मग त्याची सुरुवात होते. या सोहळ्यासाठी शोभिताने सोन्याची आणि हिरव्या रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली होती. या फोटोंमध्ये तिच्या घरातील महिला देखील दिसत आहेत.
हा पारंपारिक तेलुगू प्री-वेडिंग सोहळा आहे ज्यामुळे विवाह उत्सवाची सुरुवात होते. पसुपू म्हणजे हळद आणि दांचडम म्हणजे गाळप. या वाक्याचा अर्थ "गहू, दगड आणि हळद एकत्र चिरणे" असा होतो. या फोटोंमध्ये शोभिताने हळद फोडली होती. तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतला होता.
वाचा: आम्ही कधी बोललोच नाही; ९०च्या दशकात श्रीदेवीला टक्कर देण्याबाबत माधुरी दीक्षितने दिली प्रतिक्रिया
ऑगस्ट मध्ये चैतन्य आणि शोभिताने हैदराबादमध्ये एका खाजगी समारंभात कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. नागार्जुनने आपल्या एक्स हँडलवर आपला मुलगा चैतन्य आणि शोभिता यांच्या साखरपुड्याच्या समारंभाचे फोटो शेअर करत ही बातमी जाहीर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, "आमचा मुलगा नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, जो आज सकाळी 9.42 वाजता पार पडला. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सुखी जोडप्याचे अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो, अशी शुभेच्छा. देव आशीर्वाद देवो!