Sobhita DhulipalaWedding Ceremony :साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि स्टार नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत, त्याची एक सुंदर झलक अभिनेत्रीने दाखवली. सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी, 'मेड इन हेवन' अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘पसुपू दंचदम’ समारंभातील छायाचित्रे शेअर केली. हा समारंभ दक्षिण भारतीय संस्कृतीत विवाहाची सुरुवात आहे. याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गोधुमा राय पसुपु दंचदम आणि अशाप्रकारे सुरुवात झाली'. या प्रसंगी, अभिनेत्री गोल्डन ब्लाउजसह कोरल सिल्कची साडी परिधान करताना दिसली. तिला ही साडी होणाऱ्या सासूने म्हणजेच नागा चैतन्य याच्या आईने दिल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री तिचे लांब केस वेणी स्टाईलमध्ये बांधत, त्यावर गजरे सजवले होते. यासोबतच सोन्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या घालून तिचा हा प्री-वेडिंग इव्हेंटचा लूक पूर्ण झाला. अनेक फोटोंमध्ये, अभिनेत्री मुसळात हळद कुटताना आणि पुजारी आणि तिच्या कुटुंबातील वडिलांकडून आशीर्वाद घेताना दिसली आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्येती कॅमेऱ्यासाठी सुंदर फोटो पोझ देताना दिसत आहे. ही अभिनेत्री नागा चैतन्यसोबत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. शोभिता आणि नागा चैतन्य यांनी याच वर्षी ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा केला होता. यावेळी दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. शोभिताने'रमन राघव', 'शेफ', 'कालाकांडी', 'समीरा', 'रोझी', 'द बॉडी', 'घोस्ट स्टोरीज', 'पोनियिन सेल्वन' या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने२०१७मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले होते. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या चार वर्षांनी२०२१मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. नागा चैतन्य आता त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला आहे. मात्र, समंथा रुथ प्रभू आजही सिंगल आहे. अभिनेत्री सध्या तिच्या कामात प्रचंड व्यस्त आहे.
संबंधित बातम्या