Sobhita Dhulipala Viral Video: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्सोयाबत साखरपुडा केला आहे. दोघेही सध्या त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत आपल्या होण्याऱ्या सुनेचे कुटुंबात स्वागत केले. हे फोटो समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. याआधीही नागा आणि शोभिता यांच्या नात्याविषयी अनेकदा बातम्या समोर आल्या होत्या, पण दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही मौन सोडले नाही. अशातच नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर शोभिताचा एक ११ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शोभिताला ओळखणे तुम्हाला अवघड जाणार आहे.
शोभिता धुलिपाला हिचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ आजचा नसून २०१३ सालचा आहे. २०१३मध्ये शोभिता धुलिपालाने ‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकला होता आणि हा व्हिडीओ देखील त्या वेळचा आहे. ही व्हिडीओ क्लिप समोर आल्यानंतर शोभिता तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. या ११ वर्षांत शोभिताच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. लोकांना ११ वर्षांपूर्वीचे सौंदर्य आवडले आहे. ती कोण आहेत हे न जाणून घेता, जर तुम्ही अचानक हा व्हिडीओ पाहिलात तर, तुम्हाला शोभिताला ओळखणे खूप अवघड जाईल.
शोभिता धुलिपालाच्या या मिस इंडिया स्पर्धेच्या व्हिडीओमध्ये स्पर्धेचे परीक्षक असिन आणि जॉन अब्राहम देखील दिसत आहेत. त्याचवेळी असिन शोभिताला एक प्रश्न विचारते - ‘मुलींसाठी राज्याने किंवा कॉलेजने गणवेश निश्चित करावा, असे तुम्हाला वाटते का?’ शोभिताच्या या व्हिडीओवर चाहत्यांना जोरदार कमेंट्स येत आहेत. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘हाय रब्बा, मी ओळखूही शकलो नाही. आवाज ऐकल्यानंतर मला समजलं.’ एकाने लिहिलं, ‘आधी ही अधिक सुंदर होती.’ एकीने लिहिले की, ‘अरे बापरे! हे तिचे खरे ओठ नाहीयेत तर…’. ‘ओठांची शस्त्रक्रिया आणि बोटॉक्समुळे शोभिता आता अशी दिसतेय’, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
‘आता हिचे किती व्हिडीओ व्हायरल झाले, तरी लोक काही इम्प्रेस होणार नाहीत’, ‘ती आधीच सुंदर दिसत होती. आता तिने हा अवतार का केला असेल?’, ‘पहिला मुलगी दिसायची आता मुलगा वाटतेय..’, ‘शस्त्रक्रिया करून चेहऱ्याची वाट लावली’, अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.