प्रसिद्ध अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन वीर दाससोबत नुकतीच अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत असे काही घडले आहे, जे कदाचित तो पुढचे अनेक दिवस विसरू शकणार नाही. अभिनेता बाथरूममध्ये असताना त्याच्या अंगावर साप पडला आहे. याचा व्हिडीओ स्वतः वीर दासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. जेव्हा अभिनेता त्याच्या रूममधील बाथरूममध्ये गेला तेव्हा कुठूनतरी एक साप तिथे शिरला आणि हे पाहून तो अभिनेत्याला धक्का बसला. आता त्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता वीर दास याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे बाथरूम दिसत आहे. तसेच, बाथरूमच्या आत एक सापही वळवळताना दिसतो आहे. हा साप पूर्ण बाथरूममध्ये फिरताना दिसत आहे आणि अभिनेता त्याचा व्हिडीओ शूट करत आहे. हे दृश्य खर्च खूपच भितीदायक आहे आणि हा साप पाहिल्यानंतर वीर दास याला देखील भीती नक्कीच वाटली असणार. आता हा व्हिडीओ शेअर करताना त्याने त्याच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे.
या सापाचा व्हिडीओ शेअर करताना वीर दासने लिहिले की, 'आम्ही इथे जवळच शूटिंग करत होतो. त्यामुळे रात्री एका इको रिसॉर्टमध्ये थांबण्याचं ठरवलं. मला टॉयलेटला जायचे होते, म्हणून मी बाथरूमचा दरवाजा उघडला, आणि कमोडजवळ उभा राहिलो, माझा कार्यभाग उरकला आणि फ्लश सुरू करण्यापूर्वीच… एक साप छतावरून थेट फ्लश हँडलजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर पडला. आता मी पुन्हा हे टॉयलेट अजिबात वापरणार नाहीये.’ अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इको रिसॉर्टमध्ये राहण्याचा अभिनेत्याचा निर्णय त्याला चांगलाच महागात पडला असता. चुकूनही या सापाने अभिनेत्याला इजा केली असती, तर अनेक समस्या निर्माण होऊ शकल्या असत्या. पण अभिनेता वीर दास इतका नशीबवान होता की, तो या संभाव्य अपघातातून बचावला आणि आता सुखरूप आहे. आता या व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर अभिनेत्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तर, काहींनी अभिनेता वीर दास याची आपुलकीने चौकशी केली आहे.
संबंधित बातम्या