Smita Tambe: शेतीवर आधारित नवा सिनेमा! स्मिता तांबे साकारणार महत्त्वाची भूमिका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Smita Tambe: शेतीवर आधारित नवा सिनेमा! स्मिता तांबे साकारणार महत्त्वाची भूमिका

Smita Tambe: शेतीवर आधारित नवा सिनेमा! स्मिता तांबे साकारणार महत्त्वाची भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2024 09:56 AM IST

Smita Tambe Upcoming Movie: स्मिता तांबे महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या शेतीप्रधान विषयावरील "कासरा" या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

शेतीवर आधारित नवा सिनेमा! स्मिता तांबे साकारणार महत्त्वाची भूमिका
शेतीवर आधारित नवा सिनेमा! स्मिता तांबे साकारणार महत्त्वाची भूमिका

Smita Tambe Kasara Movie: अभिनेत्री स्मिता तांबेने आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या द समदार अभिनयाचे दर्शन घडवले आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यासोहळ्याला चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

"कासरा" या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेते गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बाल कलाकार साई नागपूरे यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. शिवाय जनमेजय तेलंग, तन्वी सावंत हे कलाकार या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. विष्णू खापरे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
वाचा: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

स्मिता तांबेनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीत आता "कासरा" चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीप्रधान विषयावरील "कासरा" हा चित्रपट अन्नदात्या शेतकऱ्याला वेगळा दृष्टिकोन देणारा आहे. शेतीतील प्रश्न मांडतानाच त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न हा चित्रपट करतो. त्यामुळे स्मिता तांबेसारख्या दमदार अभिनेत्रीच्या अभिनयानं या चित्रपटाचं कथानक वेगळ्या उंचीवर गेलं आहे. कासरा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना ३ मे पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाचा: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं "कासरा" चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांचा कासरा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे तर अविनाश सातोसकर यांनी छायांकन केले आहे. चित्रपटातील गाणी गायक जावेद अली, आदर्श शिंदे गायिका आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रिषभ साठे यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. कासरा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांनामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पोस्टर पाहून चित्रपटात काही तरी नवे पाहायला मिळणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner