मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Thalapathy Vijay: विजयकांत यांचं अंतिम दर्शन घ्यायला गेलेल्या साऊथ सुपस्टारला चाहत्याने मारली चप्पल!

Thalapathy Vijay: विजयकांत यांचं अंतिम दर्शन घ्यायला गेलेल्या साऊथ सुपस्टारला चाहत्याने मारली चप्पल!

Dec 29, 2023 04:36 PM IST

Slipper Attack On Thalapathy Vijay: विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या थलापती विजयवर चाहत्यांच्या गर्दीतून एक चप्पल फेकून मारण्यात आली.

Slipper Attack On Thalapathy Vijay
Slipper Attack On Thalapathy Vijay

Slipper Attack On Thalapathy Vijay: साऊथचे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांचे काल (२८ डिसेंबर) निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. अनेक कलाकार मंडळींनीही विजयकांत यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी साऊथ सुपरस्टार जोसेफ विजय अर्थात थलापती विजय हा देखील विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता. मात्र, यावेळी अभिनेत्याचा एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या थलापती विजयवर चाहत्यांच्या गर्दीतून एक चप्पल फेकून मारण्यात आली. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे अभिनेता विजय देखील गोंधळून गेला होता.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता थलापती विजय हा विजयकांत यांना आपले गुरु मानायचा. त्याने विजयकांत यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले होते. विजयकांत यांचं अंत्यदर्शन घेताना थलापती विजय अतिशय भावुक झाला होता. तर, आपल्या गुरूंचं अंत्य दर्शन घेऊन परतत असताना चाहत्यांच्या गर्दीतून एका व्यक्तीने विजयला चप्पल फेकून मारली. मात्र, वेळीच सुरक्षा रक्षकांचे लक्ष गेल्याने त्यांनी ती चप्पल अडवून पुन्हा गर्दीच्या दिशेने फेकली. सुरक्षा रक्षकांनी विजयला घटनास्थळावरून सुखरूप बाहेर जाण्याची व्यवस्था करून दिली.

या दरम्यानचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तामिळ सुपरस्टार थलापती विजय प्रचंड गर्दीतून वाट काढत आपल्या कारपर्यंत पोहोचताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी गर्दीतील एका व्यक्तीने जोसेफ विजयच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न देखील केला. याचवेळी एकाने त्याच्या दिशेने चप्पल भिरकावली. मात्र, यावेळी अभिनेता मागे वळून न पाहता सरळ गाडीच्या दिशेने निघून गेला. तर, विजय सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाने ती चप्पल ज्या दिशेने आली, त्याच दिशेला परत भिरकावून लावली. मात्र, ही चप्पल नेमकी कुणी फेकून मारली, हे समोर आलेले नाही. तर, प्रचंड गर्दीमुळे चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीला पकडता देखील आलेले नाही.

WhatsApp channel