रवी चारी देणार सतार वादनाचे धडे! कधी आणि कुठे? जाणून घ्या संपू्र्ण माहिती...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रवी चारी देणार सतार वादनाचे धडे! कधी आणि कुठे? जाणून घ्या संपू्र्ण माहिती...

रवी चारी देणार सतार वादनाचे धडे! कधी आणि कुठे? जाणून घ्या संपू्र्ण माहिती...

Jun 14, 2024 02:17 PM IST

Sitar Workshop For All: मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत तुम्हाला प्रख्यात सतार वादक रवी चारी यांच्याकडून सतार वादनाचे धडे गिरवता येणार आहेत.

प्रख्यात वादकाकडून सतार शिकण्याची सुवर्ण संधी!
प्रख्यात वादकाकडून सतार शिकण्याची सुवर्ण संधी!

Sitar Workshop For All: भारतीय मनोरंजन विश्वात शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य यांना एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. शास्त्रीय संगीत अगदी पूर्वापार चालत आलं आहे. आजकालचे नृत्य, गाणी आणि संगीत हे सगळं काही शास्त्रीय संगीतावरच आधारित आहे. शास्त्रीय संगीत हेच संगीताचं मूळ आहे. अगदी पार्टी, रॅपपासून ते आलाप लावून गायलं जाणारं एखादं शास्त्रीय गाणं... यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात ती वाद्य. 

अशाच वाद्यांपैकी एक म्हणजे सतार. आपल्याला देखील शास्त्रीय संगीताच्या वाद्यांपैकी एखादे वाद्य वाजवण्याची कला अवगत व्हावी, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र, प्रत्येकालाच आपली ही इच्छा पूर्ण करता येईलच, असं नाही.

एखादं वाद्य शिकायचं म्हटलं की, ते कुणाकडून शिकावं? गुरु म्हणून कोणाला निवडावं? हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक असाल, तर शास्त्रीय वाद्यांपैकी सतार हे वाद्य शिकण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत तुम्हाला प्रख्यात सतार वादक रवी चारी यांच्याकडून सितार वादनाचे धडे गिरवता येणार आहेत. ग्लिटेरिटी संगीत अकादमी व स्वरदा कम्युनिकेशनच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा होणार आहे.

ही कार्यशाळा कधी आणि कुठे चालणार आहे आणि याचे नियम काय आहेत, हे आपण जाणून घेऊया. 

कुठे आणि कधी पार पडणार सतार वादन कार्यशाळा?

पत्ता: ५०३, पाचवा माळा, बाल गंधर्व रंग मंदिर, वांद्रे (पश्चिम), मुंबई- ४०० ०५०.

दिनांक: रविवार, १६ जून २०२४

वेळ: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत

एकदिवसीय सतार वादन कार्यशाळेचे नियम काय?

> या एकदिवसीय सतार वादन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

> सतार वादनाची ही कार्यशाळा संगीतप्रेमी आणि वादकांसाठी खुली असणार आहे.

> या सतार वादन कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे वाद्य घेऊन येणे बंधनकारक आहे.

> या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी फीची रक्कम भरल्याची पावती आवश्यक आहे.

कसा नोंदवाल सहभाग?

> रवी चारी यांच्या या एक दिवसाच्या सतार वादन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आणि अधिकची महिती मिळवण्यासाठी तुम्ही स्वरदा- ९६१९७५६८९७ आणि अश्विनी चौधरी- ९८२११७८३३० या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

> याशिवाय अधिक माहितीसाठी तुम्ही glitteratimusicacademy@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.

> या कार्यशाळेत सहभागी होऊन सतार वादन शिकण्याची संधी काही मोजक्याच लोकांना मिळणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून, याचा लाभ नक्की घ्या.

Whats_app_banner