BO Collection : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’मध्ये अटीतटीची लढाई; कोणता चित्रपट आघाडीवर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  BO Collection : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’मध्ये अटीतटीची लढाई; कोणता चित्रपट आघाडीवर?

BO Collection : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’मध्ये अटीतटीची लढाई; कोणता चित्रपट आघाडीवर?

Nov 07, 2024 11:26 AM IST

singham again vs bhool bhulaiyaa 3 : 'सिंघम अगेन' हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दरम्यान, आता 'सिंघम अगेन'च्या सहाव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत किती कलेक्शन केले आहे.

 भूल भुलैया 3  
सिंघम अगेन
भूल भुलैया 3 सिंघम अगेन

singham again vs bhool bhulaiyaa 3 : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला, ज्याचा खूप फायदा झाला. या मल्टिस्टार चित्रपटाने ओपनिंग डेपासूनच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. अशातच आता चित्रपट प्रदर्शित होऊन ६ दिवस उलटले आहेत. 'सिंघम अगेन' दिवसेंदिवस चांगली कमाई करत आहे. इतकंच नाही तर 'सिंघम अगेन' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दरम्यान, आता 'सिंघम अगेन'च्या सहाव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत किती कलेक्शन केले आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटासोबत प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशा तऱ्हेने कमाईच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा लागली होती. पहिल्याच दिवशी 'भूल भुलैया ३'ने ३५.५ कोटींची कमाई केली. तर 'सिंघम अगेन'ने ४३.५ कोटी रुपयांची कमाई करत आघाडी घेतली होती. दरम्यान, बुधवारच्या कमाईवर नजर टाकली तर सॅनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार अजय देवगणच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी १०.२५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन १६४ कोटी रुपयांवर गेले आहे. तर 'भूल भुलैया ३'ने बुधवारी १०.५० कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता १४८.५० कोटी रुपये झाले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. 

२ दिवस - ४२.५ कोटी

३ दिवस - ३५.७५ कोटी

४ दिवस - १८ कोटी

५ दिवस - १४ कोटी

६ दिवस - १०.२५ कोटी (सुरुवातीचा रिपोर्ट)

एकूण कलेक्शन- १६४.०० कोटी (सुरुवातीचा रिपोर्ट)

रोहित शेट्टीच्या चित्रपटात ‘या’ स्टार्सची मांदियाळी

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट एक नाही तर अनेक स्टार्सनी सजलेला आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Whats_app_banner