Singham Again Box Office Collection Day 13: रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा दिवाळीत रिलीज झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे थंड पडला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये मोठ्या अपेक्षांसह प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची धमाल बघता तो प्रचंड नफा कमावणार असे वाटत होते. ओपनिंग वीकेंडपर्यंत या चित्रपटाने दमदार कलेक्शन केले, पण पहिल्याच आठवड्यात 'सिंघम अगेन'चे नशीब डब्यात गेल्याचे दिसत आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाची स्थिती बिघडली आहे आणि या दरम्यान तो केवळ काही कोटींची कमाई करू शकला आहे.
या चित्रपटात खूप जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्सही आहेत. अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर यांसारख्या दिग्गज स्टार्सची फौजही आहे आणि चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खानचाही कॅमिओ आहे. मात्र, मनोरंजनाचे सर्व घटक असूनही 'सिंघम अगेन' प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या आठवड्यापासून हा चित्रपट कमाईसाठी आसुसलेला दिसतोय आणि आता तो फ्लॉप होणार, असे चित्र दिसत आहे.
या सगळ्यात 'सिंघम अगेन'च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात १७३कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी 'सिंघम अगेन'ने ८ कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी १२.२५ कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी ४.२५ कोटी रुपये आणि दुसऱ्या मंगळवारी ३.५ कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या १३व्या दिवशीचे म्हणजेच दुसऱ्या बुधवारी कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन' ने रिलीजच्या १३व्या दिवशी ३.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, 'सिंघम अगेन'ची १३ दिवसांत एकूण कमाई आता २१७.६५ कोटींवर पोहोचली आहे.
दुसऱ्या आठवड्यात ‘सिंघम अगेन’ बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. काही कोटींची कमाई करण्यासाठी हा चित्रपट खूप धडपडत आहे. रिलीजच्या १३ दिवसांनंतरही या चित्रपटाने २५० कोटींचा आकडाही गाठलेला नाही, त्यामुळे अजय देवगणला या ॲक्शन थ्रिलरसह ३५० कोटी रुपयांचे बजेट ओलांडणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत 'सिंघम अगेन' आता फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.
यातच आता सूर्या आणि बॉबी देओलचा बहुप्रतिक्षित ‘कंगुवा’ हा चित्रपट १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे आगाऊ बुकिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे 'सिंघम अगेन' हा चित्रपट ‘कंगुवा’पूर्वीच पॅकअप होताना दिसत आहे.