सोनू निगमला कर्नाटक हाय कोर्टकडून दिलासा, FIR रद्द करण्यासाठी केला होता अर्ज
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सोनू निगमला कर्नाटक हाय कोर्टकडून दिलासा, FIR रद्द करण्यासाठी केला होता अर्ज

सोनू निगमला कर्नाटक हाय कोर्टकडून दिलासा, FIR रद्द करण्यासाठी केला होता अर्ज

HT Marathi Desk HT Marathi
Published May 15, 2025 05:01 PM IST

कन्नड भाषेच्या वादाप्रकरणी सोनू निगमविरोधात बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता एफआयआर रद्द करण्याच्या सोनूच्या अपिलावरील सुनावणीत हाय कोर्टाने त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे म्हटले आहे.

सोनू निगम
सोनू निगम

Sonu Nigam: कन्नड समाजाचा अपमान केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गायक सोनू निगमला दिलासा दिला आहे. सोन निगमवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले असले तरी तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनू निगमने आपल्याविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

गेल्या महिन्यात एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या विवादानंतर तक्रारीच्या आधारे बेंगळुरू पोलिसांनी बीएनएस कायद्याच्या कलम 351 (2) (गुन्हेगारी धमकी), 352 (1) (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान) आणि 353 (सार्वजनिक उपद्रव भडकवण्याची शक्यता) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण एका म्युझिक इव्हेंटचे आहे. काही लोक सोनू निगमला कन्नडमध्ये गाण्याची मागणी करत होते. रागाच्या भरात सोनूने असे काही सांगितले जे कन्नड समाजातील लोकांना आवडले नाही. सोनूच्या या वक्तव्यानंतर संतापलेल्या लोकांनी बेंगळुरूमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केले होते.

FIR रद्द करण्यासाठी केले होते अपील

सोनू निगमला बेंगळुरू इव्हेंट वादात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ही घटना २२ एप्रिल रोजी बेंगळुरूमध्ये घडली होती. या कार्यक्रमात त्याने कन्नड लोकांची तुलना पहलगाम हल्लेखोरांशी केल्याचा आरोप सोनूवर करण्यात आला होता. संतप्त लोकांनी ३ मे रोजी सोनू निगमविरोधात एफआयआर दाखल केला. एफआयआर रद्द करण्यासाठी सोनूने कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केले होते. १५ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने सोनूवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच सोनूला तपासात सहकार्य करण्यास सांगितले. मीडिया रिपोर्ट आणि थर्ड पार्टीच्या तक्रारीवर हे प्रकरण आधारित होते. सोनूच्या वकिलांनी जाहीर माफीचा दाखला दिला, तर सरकारने थेट प्रक्षेपणादरम्यान हे वक्तव्य करण्यात आल्याचा युक्तिवाद केला आणि या प्रकरणातील कायदेशीर कारवाई योग्य ठरवली.

काय होते प्रकरण?

बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील म्युझिक कॉन्सर्टमध्ये २५ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेशी संबंधित हा वाद आहे. कॉन्सर्टदरम्यान प्रेक्षकांनी सोनूला कन्नडमध्ये गाण्याची मागणी केली. रिपोर्टनुसार, सोनूने विनंतीच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आणि रागाच्या भरात त्या मुलांचा क्लास घेतला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, 'कन्नड, कन्नड, कन्नड. यही कारण है कि पहलगाम हुआ।' या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. प्रकरण चिघळताच सोनूने माफी मागितली.

Whats_app_banner