बिहारच्या शारदा सिन्हा आता या जगात नाहीत. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, गँग्स ऑफ वासेपूर यांसारख्या बॉलिवूड गाण्यांनाही शारदा यांनी आवज दिली. शारदा सिन्हा यांना मल्टिपल मायलोमा कॅन्सर होता. ५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले. शारदा यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्याशी संबंधीत अनेक किस्से समोर येत आहेत. त्यांना पहिल्या बॉलिवूड गाण्यासाठी किती पैसे मिळाले हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
मैंने प्यार किया चित्रपटाचे गाणे 'कहे तोसे सजना' किंवा हम आपके हैं कौनचे 'बाबुल' शारदा सिन्हा यांच्या आवाजाने दोन्ही गाणी लोकप्रिय झाली. हा योगायोग आहे की दोन्ही चित्रपटांचा मुख्य अभिनेता सलमान खान होता. रिपोर्ट्सनुसार, मैंने प्यार कियाचे बजेट १ कोटी रुपये होते. या चित्रपटाने ४५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटासाठी सलमान खानला ३० हजार रुपये मिळाले होते. भाग्यश्रीला १ लाख रुपये . पण शारदा सिन्हा यांना एका गाण्यासाठी फक्त ७६ रुपये देण्यात आले होते.
शारदा सिन्हा यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्या बराच काळ आजारी होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांना धक्का बसला होता. २०१८मध्ये, त्यांना मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. काल रात्री, ५ नोव्हेंबर रोजी शारदा सिन्हा यांचे निधन झाले.
वाचा: सनी लिओनीने केले दुसऱ्यांदा लग्न, मुलांच्या साक्षीने घेतली शेवटपर्यंत साथ निभावण्याची शपथ
शारदा सिन्हा या एक भोजपूरी गायिका आहेत. त्यांनी छठ पर्व गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बिहारमधील समस्तीपुर येथे १ ऑक्टोबर १९५२ रोजी शारदा यांचा जन्म झाला. म्यूझिकल कुटुंबात शारदा यांचा जन्म झाला. त्यांनी क्लासिकल संगीतात शिक्षण घेतले आहे. त्यांनी भोजपुरी आणि मैथिलीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. १९८०मध्ये शारदा यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनने आपल्या करिअरची सुरुवात केली. पण त्यांना छठ पर्वाची गाणी गाऊन खरी ओळख मिळाली.