Viral Video: भर कार्यक्रमात प्रथमेश लघाटेची गवळण ऐकून आजींनी धरला ठेका, पाहा खास व्हिडीओ-singer prathamesh laghate shared a video of an old woman dancing on his song ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: भर कार्यक्रमात प्रथमेश लघाटेची गवळण ऐकून आजींनी धरला ठेका, पाहा खास व्हिडीओ

Viral Video: भर कार्यक्रमात प्रथमेश लघाटेची गवळण ऐकून आजींनी धरला ठेका, पाहा खास व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 31, 2024 08:45 AM IST

Viral Video: सध्या सोशल माडियावर एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश लाघटेची गवळण ऐकून चक्क आजीबाई स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत. त्यांनी ठेका धरला आहे.

Viral Video
Viral Video

लिटिल चॅप्म या गाण्याच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची ओळख निर्माण करुन देणारा गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी लग्न केले. त्या दोघांचेही गायनाचे व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. लिटिल चॅम्पपासून प्रथमेश-मुग्धा चाहत्यांचे आवडते असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक होत आले आहे. अशातच नुकत्याच झालेल्या श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त त्यांनी गायनाचा कार्यक्रम केला आणि यावेळी त्यांनी गायलेलं गाणं ऐकून उपस्थितांनी त्यांचे खूपच कौतुक केलं.

प्रथमेशने शेअर केला व्हिडीओ

प्रथमेश लघाटे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एका कार्यक्रमातला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशचे गाणे ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांसाठी प्रथमेशने एक खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. प्रथमेशने त्याच्या गायनाचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ‘देवाचा देव बाई ठकडा’ ही संत एकनाथ महाराजांची गवळण गायलो. या रचनेला रसिक मायबाप प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आम्ही कलाकार मंडळी आणि रसिक मायबाप यांनी मिळून केलेला सांगीतिक गोपाळकाला आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी गोपाळ काल्यासारखा दुसरा पवित्र दिवस असूच शकत नाही.”

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

काही वेळातच प्रथमेशचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच या व्हिडीओखाली प्रथमेशच्या काही सहगायकांनीही कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. रोहित राऊत, शमिका भिडे व मुग्धा वैशंपायनदेखील कमेंट्स करत त्याचे कौतुक केलं आहे. “वा बुवा, खूप छान, किती सुंदर” अशा अनेक कमेंट्स करत प्रथमेशच्या गायनाचे कौतूक केलं आहे.
वाचा: अभिजीत सावंतचा बिग बॉस मराठीच्या घरातील गेम पाहून पत्नीने केली पोस्ट, म्हणाली...

प्रथमेश विषयी

आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी, सध्याची मराठी संगीतविश्वातील लाडकी जोडी म्हणून मुग्धा व प्रथमेश हे लोकप्रिय आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या सिझनमधील टॉप पाच स्पर्धकांमध्ये त्याने जागा मिळवली होती. या कार्यक्रमाने दोघांनाही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी दोघांनी लग्न केले. मराठी रिती-रिवाजानुसार पारंपरिक पद्धतीत दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. आता प्रथमेशच्या व्हिडीओचे कौतुक होत आहे.

विभाग