Singer Liam Payne Passes Away: ‘वन डायरेक्शन’या जगप्रसिद्ध म्युझिक बँडचा माजी सदस्य लियाम पेन याचे निधन झाले आहे. बुधवारी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाल्कनीतून पडून गायकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक मीडियानुसार, गायक लियाम त्याच्या हॉटेल कासा सुर पालेर्मोमध्ये थांबला असताना हा अपघात घडला. या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून पडून लियामचा मृत्यू झाला. ब्यूनस आयर्सच्या सार्वजनिक आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाइनच्या प्रमुखाने दिलेल्या निवेदनात गायकाच्या मृत्यूची पुष्टी केली गेली आहे. गायक लियाम पेन अवघ्या ३१ वर्षांचा होते. दुसरीकडे, गायकाच्या आकस्मिक मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाल्कनीतून पडणे हा अपघात होता की, कट होता याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक आणि ‘वन डायरेक्शन’ बँडचा माजी सदस्य लियाम पेन अर्जेंटिनामध्ये त्याच्या बँडमेट नियाल होरानच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. लियामने खूप लहान वयातच वन डायरेक्शन जॉईन केले होते आणि तो ग्रुपच्या मुख्य गायकांपैकी एक होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गायकासोबत हा अपघात होण्यापूर्वी तो लॉबीमध्ये काही विचित्र प्रकार करत होता. यावेळी तो लॅपटॉप फोडतानाही दिसला.
मीडिया रिपोर्टनुसार, वन डायरेक्शन बँड स्टार लियाम पेनने २०२१मध्ये मोठा खुलासा केला होता. त्याने म्हटले होते की, बँडसोबतच्या त्याच्या दौऱ्यात त्याला काही ड्रग्स आणि अल्कोहोलचे व्यसन लागले होते. अनेक दिवस त्याने यासाठी संघर्ष केला. त्याची प्रकृती इतकी वाईट झाली होती की, आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी त्याची एक्स गर्लफ्रेंड माया हेन्रीने त्याच्यावर गर्भपात केल्याचा आरोप केला होता. यामुळे लियाम पेन चर्चेत आला होता.
एक्स-गर्लफ्रेंड माया हेन्रीने लियाम पेनवर आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. या घटनेला अवघे काही दिवस उलटले असून, आता हा गायकाने या जगाचा निरोप घेतला आहे. या अपघातानंतर लियाम पेन राहत असलेल्या हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली होती. तिथे बरेच लोक जमले होते. दुसरीकडे, गायक लियाम पेनच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. गायकाच्या पश्चात त्याचे आई-वडील कॅरेन आणि ज्योफ, तर रुथ आणि निकोला ही दोन मोठी भावंडे आहेत. गायकाच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
संबंधित बातम्या