Armaan Malik-Aashana Shroff Marriage : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी दमदार गाणी गाणारा गायक अरमान मलिक आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अरमान मलिक आणि त्याची पत्नी आशना श्रॉफ खूप खुश दिसत आहेत. अरमान मलिक आणि त्याची पत्नी आशना मलिक यांच्या या फोटोंवर कमेंट करत त्यांचे चाहते आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या फोटोंमध्ये अरमान आनंदाने ओरडताना दिसत आहे.
अरमान मलिकने लग्नाचे सहा फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आशना आणि अरमान एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हात धरताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत आशना आणि अरमान एकमेकांचे हात हवेत उंचवतान दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत तो आशनासमोर हार घालून उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोत अरमान आनंदाने ओरडताना दिसत आहे. चौथ्या फोटोत आशना एका जारमध्ये केशरी वाळूसारखं काहीतरी टाकताना दिसत आहे. पाचव्या फोटोत आश्ना हातात माइक आणि दुसऱ्या हातात नोटबुक घेतलेली दिसत आहे. सहाव्या फोटोत आशना अरमानला मिठी मारताना दिसत आहे.
अरमान मलिकने हे फोटो शेअर करत लिहिले की, ‘तू माझे घर आहेस.’ आशनाच्या लेहंगाबद्दल बोलायचे झाले तर, पांढऱ्या पीच कलरच्या लेहंगामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यावर तिने केशरी रंगाचा दुपट्टा घातला आहे. तर, आशना पोलकी कुंदन ज्वेलरीमध्ये सुंदर दिसत आहे. तर, अरमान मलिकने पीच कलरची शेरवानी परिधान केली आहे.
अरमान मलिकच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून प्रेम केले आहे. एका युजरने लिहिले की, ‘हे फोटो पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत’. तर आणखी एका युजरने लिहिले, ‘तुम्ही दोघेही खूप क्यूट दिसत आहात’. एका तिसऱ्या युजरने लिहिले, ‘माझ्या आवडत्या लोकांचे अभिनंदन.’
३१ वर्षीय आशनाने मुंबईतील एमआयटी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली असून न्यूझीलंड टर्शरी कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतले आहे. ती एक सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये, आशनाने तिचा ऑनलाइन व्यवसाय 'द स्नॉब शॉप' सुरू केला, ज्याने फॅशन जगतात पटकन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
संबंधित बातम्या