मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...

मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 26, 2024 05:29 PM IST

Anuradha Paudwal: अनुराधा यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये माँ कालीशी संबंधित त्यांचे अनुभव सांगितले आहेत. ते ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल

Anuradha Paudwal
Anuradha Paudwal

बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल या त्यांच्या भक्ती गीते आणि भजनासाठी प्रसिद्ध आहेत. देशात जेव्हा जेव्हा नवरात्र साजरी होते तेव्हा अनुराधा पौडवाल यांची भजन गाणी नक्कीच वाजवली जातात. मात्र अनुराधा स्वतः माँ कालीच्या मोठ्या भक्त आहे. इतकाच नव्हे तर माँ कालीने स्वतः त्यांना अनेकदा दर्शन दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय त्यांच्या आयुष्याशी निगडित गोष्टीसंबंधी अनेक सल्ले दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

एक महिन्याच्या मुलीचे निधन

अनुराधा यांनी नुकताच प्रीतिका रावच्या पॉडकास्टमध्ये माँ कालीशी संबंधित त्यांचे अनुभव व्यक्त केले आहेत. अनुराधा या माँ कालीच्या भक्त कशा बनल्या याविषयी देखील खुलासा झाला आहे.अनुराधा म्हणाल्या, "ही गोष्ट 1983 सालची आहे. मला चंद्रा नावाची मुलगी होती. मात्र एक महिन्याची असताना तिचे निधन झाले. या काळात मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी जेव्हा कधी माझी गाणी रेकॉर्ड करायला जायचो तेव्हा खूप उदास व्हायचे. त्यामुळे या काळात मला दक्षिणाबाबू भेटले. ज्यांनी मला कलकत्त्याच्या माँ काली मंदिरात जाण्याचा सल्ला दिला. मी त्याला सांगितले की मी नेहमी माँ काली मंदिरात जातो. मग त्याने विचारले की तू कोणत्या मंदिरात जातेस? मी कालीघाट असे उत्तर दिले. त्यावर त्याने मला सांगितले की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा कालीच्या दक्षिणेश्वर मंदिरात जा आणि कालीमातेला सांगा की मी आता तुम्हाला शरण आले आहे. यानंतर मी तिथे गेले आणि माँ कालीला पहिल्यांदा पाहिले. मला साक्षात्कार झाला. माँ कालीने मला प्रत्यक्षात दर्शन दिले होते. तेव्हापासून मी माँ कालीची भक्त झाले."

घरासाठी मिळाले मार्गदर्शन

अनुराधा यांनी माँ कालीसोबतच्या साक्षात्काराचा अजून एक अनुभव शेअर करताना सांगिटले की, त्यांना माँ कालीने घर कुठे घ्यायला हवे याबद्दल देखील मार्गदर्शन केलं होतं. अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “मी बराच काळ सांताक्रूझमध्ये राहत होते आणि मला खारला शिफ्ट व्हायचे होते. घराचा शोध घेत असताना मला एक दृष्टांत झाला. मी माँ कालीचा आवाज ऐकला. माँ कालीने मला एक जागा दाखवली आणि म्हणाली की तिथे माझेही घर आहे. मात्र प्रत्यक्षात ती जागा अनुराधा काही शोधू शकल्या नाहीत. अशावेळी त्यांनी प्रार्थना करत कालीमातेक़डे मदत मागण्याची विनंती केली आणि २४ तासात एका व्यक्तीने त्यांना एक जागा दाखवली. चमत्कार म्हणजे जेव्हा अनुराधा यांनी ती जागा पहिली तेव्हा त्या बंगल्यासमोर कालीमातेचे तेच मंदिर होत जे त्यांनी स्वप्नात पाहिलं होत.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी

याशिवाय अनुराधा यांनी असेही सांगितले की, दिवंगत गुलशन कुमार यांनी तिला माँ कालीची एक मोठी मूर्तीही दिली होती. ज्या मूर्तीची अनुराधा प्राणप्रतिष्ठा करणार होत्या. मात्र पुन्हा एकदा कालीमातेने स्वप्नात दर्शन देऊन मूर्टीची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसण्याचे सांगितले.

Whats_app_banner