Ayodhya Ram Mandir Song: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणे ऐकलत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayodhya Ram Mandir Song: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणे ऐकलत का?

Ayodhya Ram Mandir Song: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणे ऐकलत का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2024 10:26 AM IST

Aadarsh Shinde: श्रीराम मंदिर उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर गायक आदर्श शिंदे यांचे 'प्रभू श्रीराम' हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

Aadarsh Shinde
Aadarsh Shinde

अयोध्येतील राम मदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य तयारी केली जात आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

गायक आदर्श शिंदे यांच्या अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेले संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारे आहे. ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.
वाचा: ‘केजीएफ’ स्टार यशचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडीओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केले आहे.

प्राण-प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी ८ हजाराहून अधिक व्हीआयपी लोक देश-विदेशातून येणार आहेत. अयोध्या विमानतळावर कमर्शियल फ्लाइटसोबतच ४० चार्टर्ड प्लेन उतरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्या एयरपोर्टवर सध्या आठ शहरांसाठी एअरपोर्ट कनेक्टिविटी सुरू झाली आहे. या शहरांमध्ये लखनऊ, दिल्ली, मुंबई, कोलकाता अहमदाबाद, चेन्नई आणि गोवा शहरांचा समावेश आहे.

Whats_app_banner