sidhu moose wala : ५८व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिलेला बाळाला जन्म; कसा दिसतो दिवंगत गायकाचा भाऊ? पाहा फोटो
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  sidhu moose wala : ५८व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिलेला बाळाला जन्म; कसा दिसतो दिवंगत गायकाचा भाऊ? पाहा फोटो

sidhu moose wala : ५८व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिलेला बाळाला जन्म; कसा दिसतो दिवंगत गायकाचा भाऊ? पाहा फोटो

Nov 08, 2024 10:43 AM IST

sidhu moose wala brother : सिद्धू मूसेवालाच्या भावाचा एक नवीन फोटो त्याच्या आई-वडिलांनी शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सगळ्यांना सिद्धूची आठवण आली आहे.

सिद्धू मूसेवालाचा भाऊ
सिद्धू मूसेवालाचा भाऊ

sidhu moose wala brother face reveal : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या आई-वडिलांनी आपल्या धाकट्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सिद्धूच्या आई-वडिलांनी सिद्धूच्या भावाची झलक संपूर्ण जगाला दाखवली आहे. सिद्धू मूसेवाला याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून छोट्या मूसेवालाचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो शेअर होताच त्यावर लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. लोक छोट्या मूसेवालावर म्हन्जेच्य सिद्धूच्या भावावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत.

सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिद्धू आणि आई चरण कौर यांनीही फोटो शेअर करत चाहत्यांसाठी एक खास संदेश लिहिला आहे.  त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘त्याच्या डोळ्यात एक खास गहिरेपणा आहे, जो आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य त्यात चांगल्या प्रकारे सामावून घेतो. चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि शब्दांपलीकडचा अनमोल प्रकाश आपल्याला त्या गोष्टीची आठवण करून देतो, जे अनंतकाळाकडे सोपवले होते. आता तो परत आल्यासारखे वाटते आहे. तुम्हा सर्व बंधू-भगिनींच्या प्रार्थनांसाठी मनापासून धन्यवाद. तो पुन्हा छोट्या रुपात परत येत आहे, देवावर आमची पूर्ण श्रद्धा आहे, आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.’

५८व्या वर्षी दिला बाळाला जन्म

यावर्षी मार्चमध्ये सिद्धूचे आई-वडील पुन्हा एकदा आई-बाबा झाले. चरण कौर यांनी वयाच्या ५८व्या वर्षी आयव्हीएफच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला. सिद्धूच्या भावाचा जन्म झाला तेव्हा चाहत्यांनी सिद्धू परतल्याचं म्हटलं होतं. ज्युनियर मुसेवालाचा हा नवा फोटो, ज्यामध्ये मूसेवालाचा लहान भाऊ आई-वडिलांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. या गोंडस बाळाचे सुंदर रूप पाहून तुमचे हृदय विरघळेल. दिसायला तो हुबेहूब त्याच्या मोठ्या भावासारखा दिसतो. सिद्धू मूसेवालाच्या धाकट्या भावाचे नाव शुभदीप सिंह आहे. कारण, हेच मूसेवालाचे खरे नाव होते.

सिद्धू मूसेवाला पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक होता. त्याच्या भारदस्त आवाज आणि रॅप कौशल्याच्या जोरावर त्याने जगभरात ओळख मिळवली होती. पण, २९ मे २०२२ रोजी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने त्याची सार्वजनिकरित्या गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर त्याचे वडील बलकौर सिंह आणि चरण सिंह यांनी त्यांच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला, जो अजूनही सुरू आहे. सिद्धू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र, गायिकेच्या आईने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिल्याने मूसेवाला कुटुंबात आनंद परतला.

Whats_app_banner