मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidhu Moose Wala Mother: सिद्धू मुसेवालाच्या घरी गुडन्यूज! दिवंगत गायकाची आई पुन्हा देणार बाळाला जन्म

Sidhu Moose Wala Mother: सिद्धू मुसेवालाच्या घरी गुडन्यूज! दिवंगत गायकाची आई पुन्हा देणार बाळाला जन्म

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 27, 2024 12:51 PM IST

Sidhu Moosewala Mother Pregnant: दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून, लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

Sidhu Moosewala Mother Pregnant
Sidhu Moosewala Mother Pregnant

Sidhu Moosewala Mother Pregnant: लोकप्रिय दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आज जरी या जगात नसला, तरी चाहत्यांच्या मनात मात्र आजही जिवंत आहे. सिद्धू मुसेवाला याची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र, आता सिद्धू मुसेवाला याच्या घरून आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून, लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यांच्या कौटुंबिक सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गायक सिद्धू मुसेवाला याची आई चरण कौर पुन्हा एकदा आई होणार असल्याचे समोर आले आहे. चरण कौर आणि बलकौर सिंह यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. या वयात चरण कौर पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पुढील महिन्यात आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र, २९ मे २०२२ रोजी बिष्णोई गँगने गायकावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला. त्यावेळी सिद्धू मुसेवाला अवघ्या २८ वर्षांचा होता. मात्र, त्याने आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. इतक्या तरुण वयात त्याने भरपूर प्रसिद्धीही मिळवली होती. सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती.

सिद्धू मुसेवालाची आई एका खास तंत्राच्या मदतीने या मुलाला जन्म देणार आहे. सिद्धू मुसेवाला याचे काका चमकौर सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर यांची गर्भधारणा केल्याचे बोलले जात आहे. येत्या मार्च महिन्यात सिद्धू मुसेवालाची आई या नव्या बाळाला जन्म देणार आहे. सिद्धू मुसेवाला याच्या काकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी त्याच्या पालकांनी मात्र या वृत्तावर अद्याप मौन बाळगले आहे. नव्याने जगात येणाऱ्या बाळाची सुरक्षा हे यामागचे मोठे कारण असू शकते.

IPL_Entry_Point

विभाग