मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म! सोशल मीडियावर शेअर केली मुलाची झलक

Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म! सोशल मीडियावर शेअर केली मुलाची झलक

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 17, 2024 09:47 AM IST

Sidhu Moosewala Mother Gives Birth To Baby Boy: सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांना पुन्हा एकदा मातृत्व सौख्य लाभलं असून, त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे.

सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म
सिद्धू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म

Sidhu Moosewala Mother Gives Birth To Baby Boy: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांना पुन्हा एकदा मातृत्व सौख्य लाभलं असून, त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नवजात बाळाचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, 'शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने आणि अनंत शुभेच्छांमुळे देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्याकडे पाठवले आहे. देवाच्या आशीर्वादाने आई आणि बाळ निरोगी आहे. सर्व हितचिंतकांच्या या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.’ त्यांच्या या पोस्टवर आत जगभरातील चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर, कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत.

Crew Trailer:एअर हॉस्टेस बनून करीना-क्रिती-तब्बू करणार धमाल! ‘क्रू’चा धमाकेदार ट्रेलर पाहिला का?

बाळाला जन्म देण्याचा मोठा निर्णय!

सिद्धू मुसेवालाच्या आईने वयाच्या ५८व्या वर्षी पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. चरण कौर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने आई बनल्या आहेत. ६० वर्षांचे बलकौर सिंह पुन्हा एकदा बाबा झाले आहेत. ही बातमी समजल्यानंतर सिद्धूचे चाहतेही खूश आहेत. जगभरातील चाहत्यांनी सिद्धूच्या पालकांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की, या बाळाच्या रूपाने सिद्धू मुसेवाला पुन्हा परतला आहे.

सिद्धू मुसेवालाचे चाहते आनंदले!

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची २०२२मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आपला एकुलता एक मुलगा गमवल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. मात्र, कुटुंबाच्या हितासाठी त्याच्या पालकांनी आयव्हीएफ तंत्राद्वारे पुन्हा एकदा गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धू मुसेवालाच्या लहान भावाच्या जन्माची बातमी समोर येताच जगभरातील चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला याची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी महिंद्रा बोलेरो आणि टोयोटा कोरोला या दोन मॉडेल्सचा वापर करण्यात आला होता. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी घेतली होती.

IPL_Entry_Point

विभाग