मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidhu Moose Wala : वयाच्या ५०व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई देणार मुलांना जन्म, वडिलांनी केली पोस्ट

Sidhu Moose Wala : वयाच्या ५०व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई देणार मुलांना जन्म, वडिलांनी केली पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 12, 2024 07:18 PM IST

Sidhu Moose Wala Father Post: सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर वडिलांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Sidhu Moosewala Mother Pregnant
Sidhu Moosewala Mother Pregnant

Sidhu Moosewala Mother Pregnant: दिवंगत पंजाबी गायब सिद्धू मुसेवालाची आई वयाच्या ५०व्या वर्षी गरोदर असल्याची माहिती समोर आली. मुसेवाला कुटुंबात नव्या पाहुण्यांचे आगम होणार आहे. अशातच सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. आता सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नीच्या प्रेग्नंसीवर मौन सोडले आहे.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील एकटे पडले होते. त्यामुळे त्यांनी आयवीएफच्या मदतीने पुन्हा आई-वडील होण्याचा निर्णय घेतला. सिद्धूच्या आईने वयाच्या ५८व्या वर्षी पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला. या वृत्ताच्या दरम्यान आता सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. आमच्याबद्दल चिंता, काळजी व्यक्त करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, कुटुंबाबाबत अनेक अफवा सुरू आहेत. या अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये.
वाचा: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले

वाचा: ती नाचण्याची जागा नाही; नोराचा मेट्रोमधील 'सैराट'वर डान्सपाहून नेटकरी संतापले

काय आहे सिद्धूच्या वडिलांची पोस्ट?

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी म्हटले की, ' आमच्याबद्दल चिंता, काळजी व्यक्त करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आभार. पण सर्वांना आवाहन करतो की आमच्या कुटुंबाबत ज्या अफवा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या काही बातम्या असतील, त्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात येतील.'
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांसाठी बम्पर गिफ्ट! १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय?

सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र, २९ मे २०२२ रोजी बिष्णोई गँगने गायकावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला. त्यावेळी सिद्धू मुसेवाला अवघ्या २८ वर्षांचा होता. मात्र, त्याने आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. इतक्या तरुण वयात त्याने भरपूर प्रसिद्धीही मिळवली होती. सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती.

WhatsApp channel

विभाग