sidharth shukla: ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम; परदेशातही कमावलेले नाव! सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  sidharth shukla: ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम; परदेशातही कमावलेले नाव! सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

sidharth shukla: ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम; परदेशातही कमावलेले नाव! सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

Published Sep 02, 2024 04:14 PM IST

Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्ला एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. तो ‘बालिका वधू’, ‘दिल से दिल तक’ आणि ‘बिग बॉस १३’सारख्या अनेक शो आणि मालिकांमध्ये दिसला. आज त्याचा तिसरा स्मृतिदिन आहे.

sidharth shukla: सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?
sidharth shukla: सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

Sidharth Shukla Death Anniversary: ‘बिग बॉस १३’चा विजेता आणि प्रेक्षकांचा सर्वात आवडता स्पर्धक, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या चाहत्यांसाठी २ सप्टेंबर हा दिवस खूप कठीण आहे. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २०२१ साली या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला होता. म्हणजेच आज सिद्धार्थ शुक्ल याचा तिसरा स्मृतिदिन आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आता या जगात नसला, तरी तो आजही त्याच्या प्रियजनांच्या आणि चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आजही त्याचे चाहते त्याची खूप आठवण काढतात. त्याच्या आठवणींनी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात.

सिद्धार्थ शुक्ला हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी झाला होता. सिद्धार्थ शुक्ला याने इंटेरिअर डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने कधीही अभिनेता होण्याचा विचार देखील केला नव्हता. त्याला प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर बनायचे होते. पण, कदाचित नशिबात काहीतरी वेगळंच होतं. आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थ शुक्ला २००४साली एका मॉडेलिंग शोमध्ये मुलाखत देण्यासाठी गेला होता. तिथे त्याच्या चांगल्या लूकमुळे त्याची लगेचच निवड झाली. मजेशीर गोष्ट म्हणजे हा अभिनेता पोर्टफोलिओशिवाय तिथे पोहोचला होता, तरीही त्याचा लूक पाहून त्याची निवड करण्यात आली.

Sidharth Shukla Birthday: सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी शहनाज गिलची खास पोस्ट; म्हणाली...

टीव्हीवर निर्माण केली ओळख!

या शोमध्ये अभिनेत्याने केवळ सहभाग घेतला नाही तर त्याने शो जिंकला. यानंतर त्याने तुर्कियेच्या मॉडेलिंग शोमध्ये भाग घेतला. परदेशातही त्याने त्याच्या लूकने जादू निर्माण केली आणि या अभिनेत्याने ‘वर्ल्ड बेस्ट मॉडेल’चा किताब पटकावला होता. यानंतर सिद्धार्थ शुक्लाला अनेक टीव्ही शोजच्या ऑफर्स आल्या. अखेर त्याने २००८च्या ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले. या मालिकेनंतर तो ‘दिल से दिल तक’, ‘बालिका वधू’ अशा अनेक मालिकांमध्ये दिसला होता.

लोकांच्या मनावर राज्य केले अन्...

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने २०१४मध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बनवण्यात आला होता. २०१९मध्ये सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस १३'मध्ये भाग घेतला आणि हा शो त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. आपल्या कणखर व्यक्तिमत्वाने, प्रामाणिकपणाने आणि खिलाडूवृत्तीने त्यांनी सर्वांची मने जिंकली. तो या सीझनचा विजेता ठरला होता. यानंतर त्याच्या हातात अनेक नवे प्रोजेक्ट होते. मात्र, अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. यातच त्याचे निधन झाले.

Whats_app_banner