सध्या वेगवेगळ्या माध्यमातून फ्रॉड होत असल्याच्या घटना घडत असल्याचे समोर येते. कधी फोनवर ओटीपीच्या माध्यमातून तर कधी सोशल मीडियावर खोटे खाते खोलून सर्वसामान्यांना लुटले जाते. आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाने ५० लाख रुपये लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सिद्धार्थ मल्होत्राने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सिद्धार्थने चाहत्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
सिद्धार्थ मल्होत्राच्या फॅन पेजवरुन एक संदेश देण्यात आला आहे. यामध्ये लिहिण्यात आलेला संदेश वाचून सर्वजण चकीत झाले आहेत. कारण एका चाहतीकडून सिद्धार्थच्या नावाने ५० लाख रुपये उकल्याची घटना समोर आली आहे. या चाहतीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सिद्धार्थला माहिती मिळताच त्याने निवेदन जारी केले आहे.
वाचा: शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती
सिद्धार्थ याची चाहती मीनू वासुदेवाला ५० लाख रुपयांचा फटका बसला आहे. खोटेनाटे सांगून तिची दिशाभूल करण्यात आली. सिद्धार्थ मल्होत्राचे प्राण हे पत्नी कियारा आडवाणीमुळे धोक्यात असल्याचे खोटे सांगत मीनू यांच्याकडून जवळपास ५० लाख रुपये उकळण्यात आले. मीनू यांना सत्य कळताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच सिद्धाला याबाबत माहिती मिळताच त्याने निवेदन जारी केले आहे.
वाचा: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ
'माझ्या लक्षात आले की वेगवेगळ्या सोशल फ्लॅटफॉर्मवरुन माझ्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे. मी, माझे कुटुंब आणि चाहते असल्याचा दावा करीत काही लोकांकडून पैसे लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. आपण ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की मी, माझे कुटुंब आणि माझी टीम अशा प्रकारांना पाठींबा देत नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जर तुम्हाला सोशल साईटवरुन कोणताही संशयास्पद पैशांची मागणी करणारा संदेश माझे नाव घेऊन केला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. सावधगिरी बाळगा आणि चुकीची माहिती पसरवू नका. माझे फॅन्स हेच माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि फॅन्सची सुरक्षा आणि विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे' असे सिद्धार्थ म्हणाला.
वाचा: कधीकाळी दोन वेळचे अन्नही मिळत नसणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती
संबंधित बातम्या