मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी चित्रपटाचा कान्समध्ये बोलबाला! सिद्धार्थ जाधवच्या ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’नं जिंकलं साऱ्याचं मन

मराठी चित्रपटाचा कान्समध्ये बोलबाला! सिद्धार्थ जाधवच्या ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’नं जिंकलं साऱ्याचं मन

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 21, 2024 11:10 AM IST

आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा ‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२४’मध्ये करण्यात आले.

सिद्धार्थ जाधवच्या ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’नं कान्समध्ये जिंकलं साऱ्याचं मन
सिद्धार्थ जाधवच्या ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’नं कान्समध्ये जिंकलं साऱ्याचं मन

बॉलिवूडचे ‘महानायक’ अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेते धर्मेंद्र यांचा सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘शोले’. आजही जगभरातील आयकॉनिक चित्रपटांमध्ये ‘शोले’चं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘शोले’ म्हणजे चित्रपटसृष्टीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं नेहमी म्हटलं जातं. ‘शोले’ हा चित्रपट पाहिला नाही, असा क्वचितच एखादा व्यक्ती तुम्हाला सापडू शकतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर, तर धुमाकूळ घातलाच. मात्र, अनेक पिढ्यांना भुरळ घातली अगदी अबालवृद्धांना देखील हा चित्रपट आजही तितकाच पसंत आहे. या चित्रपटाच्या लोकप्रियतेवर आधारित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या नावाचा एक नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा ‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२४’मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी, सगून वाघ, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ यांचा सत्कार स्वाती म्हसे I.A.S.MD महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला. या चित्रपटला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ची जोरदार घोषणा! महेश मांजरेकर नाही तर ‘हा’ अभिनेता सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा!

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ नक्की काय?

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे लक्षात येतं. पण, चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी सगळ्यांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘शोले’ हा चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. ‘शोले’ चित्रपटाच्या याच आठवणींना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटातून सलाम करण्यात आला आहे. या चित्रपटाची पहिली घोषणा चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९मध्ये करण्यात आली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे चित्रपटाचं शेड्युल अडकलं होतं. मात्र, आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दमदार स्टारकास्ट

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर, जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतुन आपल्या भेटीस येणार आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४