मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घटस्फोटाच्या चर्चांवर सिद्धार्थ जाधवने सोडले मौन, म्हणाला...
सिद्धार्थ जाधव
सिद्धार्थ जाधव (HT)
23 June 2022, 3:31 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 3:31 AM IST
  • सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने सोशल मीडियावरुन जाधव हे आडनाव हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. आता सिद्धार्थने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. (Siddharth Jadhav) त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिद्धार्थने अभिनयाच्या जोरावर केवळ मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये ही स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो सतत त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण सध्या सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा त्याच्या पत्नीने सोशल मीडियावरुन जाधव हे आडनाव हटवल्यामुळे रंगल्या आहेत. आता सिद्धार्थने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले होते. सुरुवातीला त्याने यावर बोलणे टाळले. त्यानंतर नाराज झालेल्या सिद्धार्थने तुम्हाला अशी माहिती कुणी दिली आणि कुठून मिळाली असे तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, अशा अफवा कोण पसरवतं मला माहिती नाही. आम्ही दोघेही एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये सगळं ठिक आहे.
आणखी वाचा : अक्षयमुळे ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप ठरला; निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

गेल्या काही आठवड्यांपासून सिद्धार्थच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. तो नुकताच आपल्या मुली आणि पत्नीसोबत दुबईला फिरायला गेला होता. त्याने तिथले काही फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर केले होते मात्र या फोटोंमध्ये त्याच्या मुली होत्या. त्याने पत्नीसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यावरून नेटकऱ्यांनी हा अंदाज लावला होता. मात्र आता सिद्धार्थच्या पत्नीने तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे जाधव नाव बदलून अक्कलवार केले. त्यामुळे चर्चांना उधाण आले. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि तृप्ती गेली दोन वर्ष एकत्र राहत नाहीत. मात्र याबाबतीत त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ साली लग्नगाठ बांधली होती. ते कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांना इरा आणि स्वरा अशा दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं 'झलक दिखला जा' या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र आता या जोडप्यामध्ये नक्की काय बिनसलं याचा विचार नेटकरी करत आहेत.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग