सिद्धार्ध जाधवच्या चित्रपटाचं मोठं यश; ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' ठरला प्रतिष्ठेच्या 'इफ्फी'चा मानकरी!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिद्धार्ध जाधवच्या चित्रपटाचं मोठं यश; ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' ठरला प्रतिष्ठेच्या 'इफ्फी'चा मानकरी!

सिद्धार्ध जाधवच्या चित्रपटाचं मोठं यश; ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' ठरला प्रतिष्ठेच्या 'इफ्फी'चा मानकरी!

Nov 14, 2024 11:31 AM IST

Hazaar Vela Sholay Pahilela Manus :'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट'शोले' या हिंदी चित्रपटाच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेला अनोख्या अंदाजातील चित्रपट आहे.

Hazaar Vela Sholay Pahilela Manus will premiere in IFFI Goa
Hazaar Vela Sholay Pahilela Manus will premiere in IFFI Goa

Hazaar Vela Sholay Pahilela Manus : गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात ‘इफ्फी’ महोत्सवात एक विशेष मराठी चित्रपट झळकणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाला हा मान मिळाला आहे. आता हा चित्रपट 'इफ्फी'मध्ये गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान मिळाल्यामुळे चर्चेत आला आहे. २४ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा रंगणार असून, ही चित्रपटाच्या निर्मिती टीमसाठी एक महत्त्वाची व ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट 'शोले' या हिंदी चित्रपटाच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेला अनोख्या अंदाजातील चित्रपट आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा आदर्श घालून दिला, आणि आजही त्या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' अनोख्या पद्धतीने त्याला सलाम करणार आहे.

कलाकारांची फौज!

या चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, समीर धर्माधिकारी, आनंद इंगळे, आणि श्रीरंग महाजन यांचे प्रमुख योगदान आहे. या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटाला आणखी खुलवले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोले' चित्रपट हा एक कालातीत कलाकृती मानला जातो, ज्याने भारतीय चित्रपटांना नवा दृष्टिकोन दिला. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर समाजाच्या विविध स्तरांवर आपला ठसा उमटवला. या चित्रपटातल्या संवादांचे, पात्रांचे, आणि दृश्यांची लोकप्रियता आजही कायम आहे.

Siddharth Jadhav: ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय...’; मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट वाचून वाटेल कौतुक!

नावातच दडलीये चित्रपटाची कथा

चित्रपटाच्या नावातच त्याची विशेषता आहे. 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या नावाने शोले चित्रपटाशी संबंधित असलेले अनेक संदर्भ आणि आशय दर्शवले जातात. हा चित्रपट त्या पिढीला उद्देशून आहे, ज्यांनी शोले चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवला आहे आणि त्याच्या प्रभावा असताना त्यातील संवाद, पात्रे, आणि कथा रंगवून तो काळ दणाणून सोडला. इतकंच नाही तर, आजही त्या सर्व गोष्टी कायम जपून ठेवलेल्या आहेत. चित्रपटाची कथा सध्याच्या पिढीच्या आयुष्याशी जोडताना, 'शोले'च्या प्रभावाचे दर्शन घडवते.

'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला 'इफ्फी'मध्ये गाला प्रीमियर मिळणं हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मोठं यश आहे, आणि यामुळे या चित्रपटाला जागतिक स्तरावर मिळालेली ओळख निश्चितच गौरवणारी आहे. २४ नोव्हेंबरला गोव्यात होणाऱ्या गाला प्रीमियरच्या या सोहळ्याने या चित्रपटाचे महत्त्व आणखी वाढवले आहे.

Whats_app_banner