मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान सिद्धार्थ जाधव विमान कंपनीवर भडकला! नेमकं काय झालं?

Viral Video: मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान सिद्धार्थ जाधव विमान कंपनीवर भडकला! नेमकं काय झालं?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 14, 2024 12:36 PM IST

Siddharth Jadhav Viral Video: कामानिमित्ताने मुंबई ते गोवा विमान प्रवास करताना सिद्धार्थ जाधव याला अतिशय वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.

Siddharth Jadhav Viral Video
Siddharth Jadhav Viral Video

Siddharth Jadhav Viral Video: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सध्या सिद्धार्थ जाधव मराठी चित्रपटांसोबतच काही हिंदी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. चित्रपटांच्या शूटिंगसाठी सतत धावपळ करणारा सिद्धार्थ जाधव कधी विमान, तर कधी गाड्या अशा वेगवेगळ्या मार्गांनी सतत प्रवास करत आहे. दरम्यान, आता सिद्धार्थ जाधव याला त्याच्या विमान प्रवास दरम्यान एक वाईट अनुभव आला आहे. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ जाधवनी एका विमान कंपनीवर आपला राग व्यक्त केला आहे.

कामानिमित्ताने मुंबई ते गोवा विमान प्रवास करताना सिद्धार्थ जाधव याला अतिशय वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, हे त्याने त्याच्या व्हिडीओ मधून प्रेक्षकांना आणि चाहत्यांना सांगितलं आहे. कामानिमित्ताने नुकताच सिद्धार्थ जाधव मुंबई ते गोवा प्रवास विमानाने करताना दिसला. या प्रवासादरम्यान सिद्धार्थ जाधव याला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले. 'इंडिगो' या विमान कंपनीच्या विमानातून मुंबई ते गोवा प्रवास करताना सिद्धार्थ जाधवसोबत ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो विमान कंपनीला बोल सुनावताना दिसला आहे. या व्हिडीओमधून त्याने विमान कंपनीला टोमणा मारत तक्रार केली आहे.

Munmun Dutta Engagement: ९ वर्षांनी लहान असणाऱ्या ‘टप्पू’सोबत साखरपुडा केला? अखेर ‘बबिता जीं’नी खरं सांगितलं!

हँडल विथ केअर म्हणताना...

या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव आपल्या सामानाच्या बॅगेची अवस्था दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपली बॅग दाखवताना सिद्धार्थ जाधव म्हणतो की, 'नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. आज मी इंडिगोच्या फ्लाईटमधून मुंबई ते गोवा प्रवास करत होतो. तुम्हीच बघा त्यांनी माझ्या सामानाची कशी काळजी घेतली आहे. हँडल विथ केअर म्हणताना त्यांनी अक्षरशः बॅगेचा फक्त हँडल नीट ठेवला आहे. बाकी सामानाची त्यांनी ज्या प्रकारे काळजी घेतली आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यांनी माझ्या सामानाची एवढी काळजी घेतली त्याबद्दल खरंच मी त्यांचा आभारी आहे. तुमची सेवा उपभोगून मला खरंच छान वाटतंय.' या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिद्धार्थ जाधवच्या सामानाची बॅग पूर्णपणे तुटलेली आहे. विमान प्रवास करत असताना नियमांप्रमाणे त्याने आपले सामान लगेज सेक्शनमध्ये ठेवण्यासाठी दिले होते. मात्र, सामान परत घेत असताना त्याची बॅग पूर्णपणे तुटलेली दिसली आहे.

विमान कंपनीने मागितली माफी!

विमानतळावर सामान गहाळ होणे, सामानाची मोडतोड या गोष्टी वारंवार घडताना दिसत आहेत. सिद्धार्थ जाधवसोबत देखील अशीच घटना घडली आहे. त्याची बॅग पूर्णपणे तुटलेली दिसत असून केवळ बॅगेचा हँडल शाबूत राहिला आहे. यावरच चिडलेल्या सिद्धार्थ जाधव याने आता स्वतःच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तो विमान कंपनी इंडिगोला देखील टॅग केला आहे. या व्हिडीओवर आता नेटकरी कमेंट करून आपबिती सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत आपल्या सोबत देखील अशीच घटना घडल्याचे म्हटले आहे. तर, सिद्धार्थने या विरोधात विमान कंपनीकडे तक्रार करावी, अशी विनंती देखील नेटकऱ्यांनी केली आहे. तर, सिद्धार्थ जाधवच्या तक्रारीची दखल घेत, विमान कंपनीने माफी मागून या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

IPL_Entry_Point