कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारत असतात. तसेच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी माहिती देत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती अभिनेत्री अंघोळ करताना दिसत आहे. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमधील मराठमोळी अभिनेत्री ही मिताली मयेकर आहे. ती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी. नुकताच मितालीने सोशल मीडियावर अंघोळ करतानाच फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मिताली सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील बांधवगड येथे गेली आहे. तिने तेथील जंगल सफारीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. हे जंगल व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगभरातील वाघांचे दर्शन होते, असे म्हटले जाते.
मितालीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने वयाच्या १३ व्या इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
संबंधित बातम्या