मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तुला नेणं शक्य नाही नाहीतर...', घर सोडताना सिद्धार्थ चांदेकरची भावुक पोस्ट
सिद्धार्थ चांदेकर
सिद्धार्थ चांदेकर
27 June 2022, 17:02 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 17:02 IST
  • ज्या घराने आपल्याला अडचणीच्या काळात साथ दिली, ज्याने आपल्या करियरचे चढउतार पाहिले, आईची माया दिली त्या घराला सोडून जाताना सिद्धार्थ प्रचंड भावुक झाला.(siddharth chandekar)

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar)याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सिद्धार्थच्या मनमोकळ्या स्वभावाने तो कित्येकांचा आवडता झाला. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. नुकतंच मिताली मयेकर आणि सिद्धार्थने मुंबईत नवं घर घेतल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. आता ते दोघेही त्यांच्या नव्या घरी राहायला जात आहेत. मात्र आपल्या जुन्या घराला सोडताना सिद्धार्थ भावुक झाला आहे. ज्या घराने आपल्याला अडचणीच्या काळात साथ दिली, ज्याने आपल्या करियरचे चढउतार पाहिले, आईची माया दिली त्या घराला सोडून जाताना सिद्धार्थ प्रचंड भावुक झाला. त्याने एक पोस्ट करत चाहत्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

सिद्धार्थने त्याच्या जुन्या घराचा एक फोटो शेअर केला आणि पोस्ट करत लिहिलं, 'तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहीलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू. किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी. स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन. तेव्हापण असंच थोपट.. जसं इतकी वर्ष केलंस. तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय. ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या सारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे. पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा. नीट राहूदे.'

 

घर सोडून जाताना त्या घराला सांभाळून राहण्याचा सल्ला त्याने दिला आहे. सोबतच आम्हाला विसरू नकोस अशी विनवणी देखील त्याने घराला केली आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग